मासतोडी

ziziphus oenopolia

कमी, मध्यम पावसाच्या प्रदेशात, उष्ण कोरड्या हवामानात, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढणार काटेरी झुडूप. साधारण सहा सात फुट उंच झुडूप वाढते. आधार मिळाला की दहा बारा फुटापर्यंत वाढलेल दिसुन येते. खोडावर जमीनीपासुनच फांद्या फुटलेल्या असतात. असंख्य फांद्या असल्याने झुडूपाचा पर्णसंभार दाट असतो. पान एकांतरीत, लहान देठ असलेली, देठाकडे पसरट व टोकाकडे निमुळती व टोक निघालेले असतात. पानाच्या कडा बारीक दातेरी असतात. पानाच्या तिन शिरा स्पष्ट दिसतात. पानं फांद्यांना तिरकस असतात. हिवाळ्यात हिरवट पिवळसर छोटी फुल गुच्छाने पानांच्या बगलेत येतात. हिरवी फळ गोलाकार वाटाण्या येवढे, हिवाळ्याच्या शेवटी पिकल्यावर गर्द जांभळी होतात. फळ खाण्या योग्य असतात. पक्षी फळ खातात. मासतोडी च्या फांद्यांवर भरपूर काटे असतात. एक काटा सरळ व एक हुका सारखा वळलेल्या असतो. एकदा का काट्याच्या फंद्यांत अडकल की इजा झाल्याशिवाय सुटका नाही, म्हणून याला मासतोडी नाव दिल असेल. औषधी गुणधर्म असलेल सामान्यता माहीत नसलेलं झुडूप.

identity footer