मुंग्या म्हटल की सामन्यता आपल्याला डोळ्या समोर प्रतिमा येते ती फक्त काळ्या आणि लाल मुंग्या व मोठे मुंगळे यांची. जगाच्या पाठीवर मुंग्यांच्या प्रजाती एक हजाराहून जास्त आहेत. वेगवेगळ्या मुंग्यांची आपल्या घराची रचना पण बऱ्यापैकी वेगवेगळी आहे.
त्यातिलच एक प्रकार म्हणजे काळी कॉकटेल मुंगी. शास्त्रीय नाव क्रेमॅटोगास्टर पेरिंग्वेई फक्त ठराविक ठिकाणी जंगलामध्ये दिसतात.
नेहमी आपण मुंग्याच जमीनीवरील विविध प्रकारचे घर बघत आलोय,काही मुंग्या झाडांवर, पानांना एकमेकांना जोडून घर बनवलेल आपण पहातो.
काळ्या कॉकटेल मुंग्या ह्या जास्तकरून झाडावरच रहातात असे लक्षात येते. झाडाच पान, खोडाच्या वाळलेल्या सालीचे तुकडे, माती आणि लाळे( झाडा पासून मिळणाऱ्या चिकट द्रव्य) पासून अश्या पध्दतीने झाडांनवर घर तयार करतांना आढळतात.
घर करतांना चिकट द्रव्याचा मुबलक साठा मिळण्यासाठी, काही मुंग्या त्या झाडाच्या नवीन फुटलेल्या शेंड्यांच्या लगत जावुन ते खातात. काही माती आणतात तर काही पान किंवा खोडावरची वाळलेली साल आणतात. त्यांच हे काम अविरतपणे सुरू असते, व त्या घराचा आकार वाढवत असतात. त्यांच्याजवळ गेल्यास ते पोटा पासून मागचा भाग उचलून विंचवाच्या नांगी सारखा दाखवून, जसे काही खबरदार माझ्या पासून लांब रहा अशी समज देतात. त्यांची हि घर बांधण्याची क्रिया व हालचाली,मी प्रत्यक्ष नाशिक देवराई वर माझं श्रमदान करत असताना, वेळोवेळी त्यांच्या जवळ जाऊन त्याचं निरीक्षण करून अनुभवलं आहे.
नाशिक देवराई चे सक्षम पणे जैवविविधतेकडे वाटचालीचे हे एक उदाहरणच म्हणावं लागेल.
शास्त्रीय नाव:- आयसोप्टेरा
एखाद्या झाडावर मातीचा लेप बघितल्यानंतर लोकांच्या मनात येते की वाळवी आता हे झाड खाते की काय. आणि आता हे झाड मरणार. अशा वेळेस बऱ्याच लोकांचे मला संपर्क करून विचारणा होते की आमच्या इथल्या झाडाला वाळवी लागली आहे त्याच्यावर उपाय सांगा, नाही तर झाड वाळेल.
ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणून प्रथम आपण वाळवी विषयी थोडं समजून घेऊया.
वाळवी जमिनीत राहणारा कीटक आहे, हा कीटक , जमिनीला पोषक वातावरण निर्माण करण्याचं काम करत असतो.
वाळवीने जर झाडं खाल्ली असती किंवा वाळवली असती तर ह्या धरतीवर एक पण झाड जिवंत राहिलं नसतं, जंगलं राहिली नसती,कारण की या धरतीवर असा कुठल्याही जमिनीचा भाग नाही की तिथे वाळवीचं वास्तव्य नाही. मी पंधरा वर्षा पूर्वी एक उंबराच आणि एक पॅडॉक(अंदमानचा राज्य वृक्ष), वृक्षाचे असे दोन ठिकाणी वारुळावरच रोप लावली होती, आता दोन्ही रोप मोठी झाडं झाली आहेत.
वाळवी हा निसर्ग साखळीतील एक महत्त्वाचा घटक आहे. वाळवीचं काम म्हणजे जमीन भुसभुशीत करणं व जमिनीवर पडलेलं वाळलेल्या काड्या, पान किंवा शेण, खाऊन त्याची माती तयार करणे व जमीन पोषक बनवणे. ह्या प्रक्रियेमुळे जंगलात, वनवा प्रतिबंधक, कार्य पण वाळवी कडून होते.
झाडाला वाळवी लागते म्हणजेच काय तर झाडाच्या खोडावरची जी काही वाळलेली साल असते, वाळवी फक्त ती साल खाऊन विघटन करत असते आणि तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल, तर एखाद्या ठिकाणी झाडावर दिसणारा मातीचा लेप, त्याला हलकसं पाडल्यावर तुमच्या लक्षात येईल की फक्त वरची वाळलेली साल वाळवीने खाल्लेली आहे, व आतील स्वच्छ साल तुम्हाला बघायला मिळेल. झाडाच्या एखाद्या कमकुवत झालेल्या भागाला क्वचितच वाळवी मुळे नुकसान होऊ शकतं.
वाळवी मातीत घर करते त्याला आपण वारूळ म्हणतो. वनांमध्ये वारुळे असणं म्हणजे, वन समृद्ध असल्याचं चिन्ह आहे. वारुळाच्या माती मध्ये औषधी गुणधर्म आहेत. काही भागातील वारुळाची माती बऱ्याच ठिकाणी तालमीमध्ये कुस्तीखेळण्याच्या हौदात वापरली जाते, त्वचेसाठी उपयुक्त म्हणून मडबात साठी मातीचा वापर केला जातो.
प्रथम आपल्याला आपल्या स्थानिक वातावरणाचा व पुनर्रोपण करत असलेल्या वृक्ष प्रजातीचा व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्याकडे ऋतूनुसार वातावरणात खूप फरक असतो. पुनर्रोपन करताना नेमकं कुठल्या ऋतूत केलं गेलं पाहिजे हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर पुनर्रोपनाच्या प्रक्रियेला सुरुवात करणं गरजेचं आहे.
पहिली गोष्ट म्हणजे, आपल्याला पुनर्रोपणाची व्याख्याच नीट समजलेली नाही. प्रथम पुनर्रोपण म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. पुनर्रोपण म्हणजे, पुनर्रोपन करत असलेल्या वृक्षाचं एकही पान न तोडता, आहे त्या परिस्थितीत आहे त्या जागेवरून योग्य रीतीने काढून दुसऱ्या जागेवर त्याचे रोपण करणे म्हणजे पुनर्रोपनाची योग्य प्रक्रिया.
पण ,आपल्याकडे पुनर्रोपण म्हणजे ज्या झाडाच आपल्याला पुनर्रोपण करायचं आहे, त्या झाडाच्या पूर्ण विस्तार छाटून फक्त दहा ते पंधरा फूट खोड ठेवून त्याला बोडके व खुजे केले जाते. झा़डांची मुळ योग्य रीतीने पुनर्रोपण करताना वृक्षाबरोबर काळजीपूर्वक काढण्याची गरज असते. पण आपल्याकडे त्याचा फार अभाव व निष्काळजीपणा आहे. इथे जेसीबीच्या व क्रेन च्या साह्याने अशास्त्रीय पद्धतीने त्या पुनर्रोपण करत असणाऱ्या झाडाची मुळ जमिनीतुन ओरबाडूनच काडली जातात . त्यामुळे,वृक्षाला पोषकत्त्व पुरवणारी मुळ ताणली जातता व विचित्र पद्धतीने तुटतात. मुळ ताणली गेल्यामुळे त्यांच्यातली कार्यक्षमता संपुष्टात येते.
आपल्याकडे अजून आहे त्या स्थितीत अलगद पणे झाड उचलुन काढण्याची व नेण्याची यंत्रणा उपलब्ध नाही. ती उपलब्ध झाल्यावर पण तिचा पूर्णपणे इथल्या रस्त्यांवरून नेतांना असलेल्या विविध अडचणी मुळे, त्याचा कितपत उपयोग होऊ शकतो हे सांगायलाच नको.
जिथुन पुनरोपणासाठी झाड काढलं जातं तेथील मातीचा प्रकार व स्थलांतरित करून ज्या ठिकाणी पुनर्रोपण करायचे आहे तेथील मातीच्या वेगवेगळ्या स्तरामुळे उपयोग होऊ शकतो का नाही याची शास्वती नाही. मातीची विविधता बघायला गेलं, तर काही ठिकाणची माती भुसभुशीत, काही ठिकाणी मुरमाड(त्यातही प्रकार आहेत), काही ठिकाणी दगड गोट्यांची इत्यादी प्रकार असतात.
पुनर्रोपण करण्यात येणाऱ्या झाडाची आहे ठिकाणची परिस्थिती, काही ठिकाणी तिन चार फुटावर दगडांच्या भेगांमध्ये झाडांची मुळ गेलेली असतात. तेथे ह्या यंत्रांची पण मर्यादा येते. त्यामुळे प्रथम आपण ज्या ठिकाणावरून तो वृक्ष पुनर्रोपणासाठी काढणार आहोत, त्या ठिकाणी अगोदर सात ते आठ फूट खोल, वृक्षाच्या खोडा पासून ठराविक अंतरावर, चारही बाजूने ड्रिल करून जमिनीखालची परिस्थिती जाणून घेणे आवश्यक आहे, खाली मातीचा थर कुठपर्यंत खोल आहे,जर तीन चार फुटावरच दगड असल्याचं जाणवल्यास ते झाड पुनर्रोपण न केलेलच बरं. बराच वेळा पुनर्रोपण करताना झाडाला साखळदंडाने किंवा वायर रोपने जखडले जाते व उचलले जाते त्यामुळे त्या झाडाच्या सालीला साखळदंडाने किंवा वायर रोप घासल्यामुळे इजा होतात. त्यानंतर वाहतूक करतांना, आदळआपटा मुळे, साल आजुनच काचली जाते, व मुळांना पण हादरे बसतात. पुनरोपन करताना ज्या खड्ड्यात रोपण करायची असते तिथे रुजवताना, विशिष्ट काळजी घेतली जात नाही.
त्या नंतर पुनर्रोपण केलेल्या त्या खोडाला (खोडच म्हणाव लागेल कारण विस्तार पुर्णता छाटलेला असतो) काही दिवसांनी विविध ठिकाणी पालवी फुटते, मग आपल्याला ते जगले असे वाटते, ती पालवी त्या खोडाच्या सालीमध्ये जीवनसत्त्व असल्याकारणाने फुटलेली असते. कालांतराने झाडातले जिवनसत्व संपल्यानंतर पालवी गळून पडते. क्वचितच फुटलेली पालवी टिकल्यास ते फक्त खोडाच्या तोंडाशी व तीन ते चार फूट तोंडापासून खालपर्यंत पानाचा घोस वाढलेला दिसतो बराच काळ ते त्या मर्यादेत राहते व सुकुन जाते. ते त्याचा पूर्वीचा विस्तार घेण्यास पूर्णपणे असमर्थ असते. कारण त्याच्या मुळांना झालेल्या हनी मुळे, मुळांचा विस्तार व कार्यक्षमता पूर्वी येवढी नसल्याकारणाने त्याला पाहिजे त्या प्रमाणात पोषक तत्व मिळत नाहीत. पुनर्रोपण केलेल्या झाडाकडे सातत्याने म्हणजे ३६५ दिवस काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. ती आपल्याकडे जेवढा पुनर्रोपणासाठी अट्टाहास केला जातो, तेवढे त्याच्या संवर्धनासाठी लक्ष दिले जात नाही. या प्रक्रियेसाठी व त्यानंतर संगोपनासाठी लागणारा वेळ, मनुष्यबळ व खर्च हा खुपच आहे. यापूर्वी आपल्या नाशिक शहरांमध्ये बरच पुनर्रोपणाच गाजावाजाने काम केले गेले आहे. पण आजतागत तीन चार नारळाचे,दोन तीन इतर वृक्ष (त्यांचा आजुन बर्याच वर्षांत नीट विस्तार झालेला नाही), सोडल्यास अशा कुठल्याही पुनर्रोपण केलेल्या वृक्षाला यश प्राप्त झालेल नाही.
पुनर्रोपण केलेल्या जागेवर तो वृक्ष वाळल्यावर ती जागा वाया जाते त्याचे खोड तिथून काढायचे ठरल्यास परत खर्च असतो म्हणून ते काढले जात नाही आणि व्यापलेली जागा वाया जाते. पुनर्रोपण करण्यामध्ये वेळ, श्रम व पैसा वाया घालवण्यापेक्षा त्या पैशांमध्ये आणि वेळेमध्ये जास्त संख्येने, आठ-दहा फुटांची वाढलेली चांगली पर्यावरण पूरक वृक्षांची रोपे लागवड करून संवर्धन(अश्या रोपांना पुनर्रोपन केलेला झाडापेक्षा कमी काळजी घेण्याची गरज असते) केल्यास चांगल्या प्रकारे निसर्ग वाढीला नक्कीच हातभार लागेल.