महाराष्ट्रभरात कमी अधिक प्रमाणात सर्वत्र आढळणारा. कोरडे हवामानात,कमी व मध्यम पावसाच्या ठिकाणी डोंगर उतराला मुरमाड खडकाळ भागात पंधरा ते वीस फूट वाढणारा, पानगळ होणारा,चीक वर्गीय वृक्ष. हिवाळ्यामध्ये याची पानगळ होते. मार्च ते एप्रिल नवीन पालवी फुटते. पान तोडल्यास देठातून पांढरा चिक बाहेर पडतो. मार्च ते जून पर्यंत याचा फुलण्याचा हंगाम असतो. पाच पाकळ्यांमध्ये पांढरी शुभ्र चांदणीच्या आकाराची, मध्यभागी पिवळा छोटेखानी कळस असलेले, कळसाच्या भोवती, प्रत्येक पाकळी वर धाग्यांचे तुकडे विसावल्या सारखे, असे सुंदर रचनेचे, सुवासिक फुलांनी झाड भरलेल असतं. पूर्वी याचे फुलं काना कुडी म फुलांवर असंख्य मधमाशांची गर्दी दिसून येते.जानेवारी ते फेब्रुवारी ह्या वेळेत शेंगा येतात.शेंगांची रचना पण आगळीवेगळी, दोन शेंगा साधारण १२ इंच ते १८ इंचाच्या एकाच देठातून निघालेल्या अर्ध गोलाकार व टोक जोडलेली असतात.आयुर्वेदामध्ये याच्या पासून बनवलेले कुटजारिष्ट हे औषधाचा वापर केला जातो. सर्व गुण संपन्न असा हा आटोपशीर वाढणारा हा वृक्ष, जैवविविधता टिकविण्यासाठी लागवड करून संवर्धन करण्याची गरज आहे.