कमी, मध्यम, अधिक, पावसाच्या प्रदेशात, डोंगर उत्तराला, कड्या कपड्यांमध्ये, मुरमाड खडकाळ जमीन वाढणारे, पानगळ होणारे झुडुप. धायटी पाच ते सहा फुट उंच वाढते. फांद्या लांबट, वरती वाढुन जमिनीकडे झेपावलेल्या असतात. पान लांबट टोकाला निमुळती टोकदार बुडाशी पसरट, पत्त्यातल्या बदामासारखी, खाच पडलेली असतात. पान फांद्यांना एकमेकाविरुद्ध दिशेने येतात. पानांना देठ नसते फांद्यांना चिकटून पान वाढलेली असतात. विरुद्ध दिशेने वाढलेल्या पानांचे बुड फांदीला चिकटून असतात असे वाटते की पान गुंफत फांदी वाढलेली आहे. कवळी फांदी लालसर रंगाची असते. फांदीच्या शेवटचे दोन ते तीन पानांची जोडीला केशरी रंगाची छटा असते. पानगळ उन्हाळ्यात होते जानेवारी ते मार्चमध्ये झुडूप गर्द केशरी रंगाच्या फुलांनी भरलेले असते. फुल एप्रिल पर्यंत येतात. फुल एक ते सव्वा इंचाचा लांबट कोण, तोंडाला छोट्या त्रिकोणी आठ एक पाकळ्या निघालेल्या असतात. फुलं पानांच्या बुडाशी संख्येने येतात. फळांच्या मधून दहा ते बारा लालपुंकेसर एक ते दीड सेंटीमीटर बाहेर निघालेले असतात. फुलांवर पक्षी मध खाण्यासाठी येतात. फळ ही वेलदोड्याच्या आकाराची एक सेंटीमीटर लांबीचे बोंड असतात. औषधी गुणधर्म असलेले हे झुडूप. जैवविविधता टिकवण्यासाठी,डोंगर उताराला वृक्षरोपण करताना नक्कीच याची निवड करावी.