दक्षिण अमेरिकेतील काही भागात प्रदेशनिष्ठ असलेला टिकोमा छोटा वृक्ष किंवा मोठे झुडुप म्हणता येईल. आपल्या कडे शोभिवंत झुडूप म्हणून नर्सरींच्या माध्यमातून आणलं गेल. त्याच्या गुच्छांनी येणाऱ्या पिवळ्या घंटी सारख्या दिसणाऱ्या फुलांमुळे, बागेत, फार्महाऊस, रिसॉर्ट इत्यादी ठिकाणी शोभिवंत झुडूप म्हणून लागवड केली जाते. गुर खात नसल्या कारणाने दृत्तगती मार्गांवर दुभाजकांन मध्ये लावण्यात आले. टिकोमा जरी दिसायला छान दिसतो म्हणून लावला जातो, पण तो तेव्हढ्याच आक्रमक पद्धतीने त्याचा घाटांन मध्ये, डोंगर भागात, प्रसार होऊन आपल्या प्रदेशनिष्ठ वनस्पतींनसाठी घातक ठरत आहे. उपद्रवी कीटक निर्मितीसाठी पोषक ठरत आहेत. अश्या बऱ्याच शोभिवंत परदेशी वनस्पतींमुळे आपल्या पर्यावरणीय परिसंस्थे ची जी हानी होते ती आपण आता लक्षात घेतली पाहिजे. यापुढे असे परदेशी शोभिवंत झुडूप किंवा वृक्ष लागवड करतांना आपण त्याचा दुष्परिणामा विषयी सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. अश्या परदेशी वनस्पतींमुळे आपल्या पर्यावरणीय परिसंस्थेची एक एककडी निखळत चाललेली आहे, हे आपल्याला लक्षात येत नाहीये. वन्यजीवांच्या शाश्वत अधिवासासाठी आपल्याला अश्या घातक परिणाम ठरू पाहणाऱ्या गोष्टी वेळीच उपाययोजना करुन आवर घालण्याची गरज आहे.