बिब्बा

semecarpus anacardium

बिब्बा मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात, उष्ण हवामानात, वाढणारा पानगळीचा वृक्ष. सेमेकार्पस अनाकार्डियम असे त्याचे शास्त्रीय नाव असून. हा वृक्ष चांगल्या पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढतो. जमिनीचा स्तर व वातावरणानुसार कमी जास्त उंचीचा व विस्ताराचा असतो. खोड ठेंगणे सरळ वाढणारे. पाच सहा फुटावर फांद्या फुटतात. पान जमिनीच्या प्रकार व वातावरणानुसार आकारने लहान-मोठी असतात. साधारण एक ते दोन फुटापर्यंत लांब व पाच इंच ते दहा इंच रुंद असतात. पान लांब, देठाकडे निमुळती, टोकाकडे पसरट गोलाकार असतात. पानांना लव असते. पानाच्या खालच्या बाजूने लव जास्त असते व वरच्या बाजूस कमी प्रमाणात लव असते. पान वरून गर्द हिरवे व खालच्या बाजूने फिक्कट हिरवे असतात. पान जाडसर असतात. पानगळ उन्हाळ्याच्या सुरुवातीला होते. मे दरम्यान नवीन पालवी येते. पांढरट हिरवट छोट्या फुलांचे तुरे पावसाळ्यात येतात. फुलांचे तुरे पानांच्या बगलेत येतात. हिवाळ्यात झाडांवर फळ दिसू लागतात. हिवाळ्याच्या शेवटी फळ पिकतात. फळ पक्षांना आवडतात. फळ पिकल्यावर फळांचा देठ फुगीर पिवळा रंगाचा असतो, त्यावर काळसर रंगाचे जाड चपटे फळ विसावलेले असतात. ह्या फळालाच बिब्बा किंवा भिलावा म्हणतात. बिब्बा अत्यंत महत्त्वाचा औषधी गुणधर्म असलेला वृक्ष आहे. बिब्याच्या झाडाच्या चिक अंगावर पडल्यास उभारतो. बिब्बा निसर्गातील एक महत्त्वाचा वृक्ष आहे

identity footer