भरगच्च पर्णसंभार असल्याने वृक्षांची सावली दाट आणि गारवा देणारी असते. त्याच्यावर लाखेचे किडे चांगले पोसली जातात. विविध प्रकारे उपयोगी पडणारा औषधी गुणधर्म असलेला हा वृक्ष सर्वगुणसंपन्न आहे. वृक्षारोपणाचे नियोजन करताना हा वृक्ष दुर्लक्षित राहिला. आपल्याकडे वृक्षारोपणावेळी वृक्षांची गुणवत्ता लक्षात न घेता रोपांच्या उंचीकडे अधिक लक्ष दिले जाते. कोशिम वृक्षा चे रोप एक ते दीड फुटाहुन अधिक मोठे मिळत नाही. त्यामुळे अशा उपयुक्त रोपांची लागवड करण्यासाठी टाळाटाळ होते. ही मानसिकता जैवविविधता टिकवण्यासाठी घातक ठरू शकते. मुळातच कमी व अधिक पावसाच्या प्रदेशात उंच भरगच्च पर्ण संभार असलेला विशाल आणि देखणा हा वृक्ष आहे. वेगवेगळ्या वातावरण व जमिनीच्या पोतानुसार त्याची उंची थोडीफार कमी जास्त प्रमाणात त्या त्या ठिकाणी दिसून येते. ज्यावेळेस नवीन पालवी कुसुंबाला येते, त्यामुळे एक नयनरम्य दृश्य दिसते. फेब्रुवारी मार्चमध्ये कवळ्या लालसर रंगाची पानांनी भरलेला वृक्षांचे सौंदर्य लक्ष वेधून घेते. फुलं छोटी पांढरट पिवळसर फुलांच्या मंजिरा नवीन पालवी बरोबरच येतात. फळ चवीला गोडसर आकाराने लांबट गोल बोरासारखी असतात. अर्धा ते एक इंच काहिशी लांबटगोल व टोक असलेले फळ जुलै ऑगस्टमध्ये पिकतात. फळ खाण्यास योग्य असतात. पक्षी ही फळ खातात वृक्षांच्या बियांपासून केशवर्धक तेल बनवले जाते साल पण औषधी गुणधर्म असलेले त्याचे लाकूड उपयुक्त आहे.