रामायणात, लंकेत ज्या अशोक वाटिकेचा उल्लेख केला जातो, ते हे पौराणिक काळातील महत्त्वाचं झाड म्हणजे सीता अशोक. स्त्री च्या लता प्रहारने उमलणार असा पुराना मध्ये उल्लेख आहे. सीता अशोक हा मध्यम उंचीचा भरगच्च पानांनी भरलेला आपल्याकडे ऑटोपशीर वाढणारा परसबागेत लावण्यास योग्य असा हा वृक्ष आहे. मध्यम पावसाच्या ठिकाणी व पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये छान वाढतो. या वृक्षाला जेव्हा कवळी पालवी फुटते त्यावेळेस निसर्ग कशाप्रकारे रंगाची उधळण वृक्षांच्या विविध प्रकारच्या घटकातुन दाखवुन देत असतो, त्याच एक उदाहरणच बघायला मिळते. कवळी लोंबलेली पान, फिकट जांभळट रंगाची, त्याचा बरोबरच काही पानं दोनतीन दिवस अगोदर उमलेली जांभळट चाॅकलेटी रंगाची,नंतर काही रंगाची उधळण करत हिरवीगार होतात. फेब्रुवारी पासून सुंदर अश्या गुलाबी लालसर रंगाच्या कळ्या समुहाने दिसु लागतात. फुल जेव्हा गुच्छाने उमलतात तेव्हा त्यांचे ,लाल ,भगव्या ,पिवळ्या रंगाचे सौंदर्य म्हणजे निसर्गाची किमयाच. मे पर्यंत हा फुलण्याचा उत्सव सुरू असतो. आयुर्वेदामध्ये स्त्रीयांच्या काही रोगांवर याचा औषधांमध्ये वापर केला जातो. आशोकारीष्ट औषध या पासून बनवले जाते.