विस्तीर्ण पर्णसंबराचा चाळीस ते पन्नास फूट उंच वाढणारा, कठीण, जड, टिकाऊ लाकडाचा भारदस्त वृक्ष म्हणजे बिजा. मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात डोंगराळ भागात हा वृक्ष नैसर्गिकरित्या वाढलेला आढळतो. अल्पकाळासाठी पानगळ होते. जमिनीच्या सुपेकतेनुसार पानांची रचना काही प्रमाणात बदलते. फिकट पिवळा रंगाची फुलं मे, जून मध्ये येतात. तबकडीसारखी दिसणारी फळ म्हणजे मधला भाग काहीसा फुगीर व भोवती पातळ पापुद्राची झालर असते. फळ साधारण एक ते दिड इंच व्यासाची असतात. फळ डिसेंबर मध्ये येण्यास सुरुवात होते. मार्चपर्यंत ती परिपक्व होतात. त्यांच्या बियापासून मधुमेहावर गुणकारी औषधे आयुर्वेदामध्ये बनवले जाते. तपकिरी लालसर रंगाचा उपयुक्त डिंक मिळतो त्याला मलबार किंवा म्हणतात विविध आजारांवर डिंकापासून औषध बनवतात सध्या जंगलांमध्ये पण हा वृक्ष कमी संख्येने राहिला आहे.