नाशिक मधील रविवार कारंजा आणि पंचवटी कारंजा येथे वाड्यामध्ये दोन मोठे शमीचे वृक्ष पाहाव्यास मिळतात बऱ्याच ठिकाणी अज्ञानापोटी दुरंगी बाबळाचे रोप शमीचे म्हणून विकले जातात. अनेक जण संपर्क करतात की समितीचे झाड कुठे आहे, त्याची पूजा करायची आणि कुंडीत लावायचे आहे ,अशी विचारणा करतात. काही जण अंधश्रद्धेपोटी शमीचे रोप कुंडीत लावून घरात ठेवतात, कालांतराने अतिपाणी आणि ऊन न मिळाल्याने रोप सुकते. रोप कुंडीत लावण्याऐवजी आपल्या शेजारील उद्यानाच्या जागेत अथवा योग्य ठिकाणी लावावे. त्याचे संवर्धन करावे, त्यामुळे शमी रोप चांगले वाढुन, निसर्गातील एक महत्त्वाचं स्थान असलेल्या शमी वृक्ष वाढल्यामुळे आपल्याला नक्कीच आनंद व त्याची जोपासना केल्याचे पुण्य मिळेल.