कुमुदिनी / कोयकमळ

nymphaeaceae

कुमुदिनीच प्रचलित नाव आहे वॉटर लिली. ही एक जल वनस्पती असून ज्याला सामान्यता कमळ म्हटले जाते. कमळ आणि कुमुदिनी मधला फरक ओळखण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. त्या सहजासहजी लगेच लक्षात येतात. कुमुदिनीचे पान हे पाण्यावर तरंगत असतात. पानांवर ओलावा टिकून राहतो. जिथे पानांना देठ चिकटलेला असतो, तेथे मागच्या बाजूला पानं सरळ फाटलेले असतात,. अथवा काही ठिकाणी व्ही(V) आकाराची अशी खाच पडलेली असते. काही कुमुदिनीचे पानं गोल असतात. काही काटेरी असतात. काही पानांवर तपकिरी रंगाची रचना असते. काही पानं पूर्णता गर्द हिरव्या रंगाचे असतात. काही पानांना कडेला लालसर छट्टा असते. असे कुमुदिनीच्या पानांमध्ये पाच ते सहा प्रकार बघायला मिळतात. कुमुदिनीची फुल पाण्यावर अथवा पाच ते सहा इंच पाण्यापासून वरती फुलली असतात. फुलांना सुंदर सुगंध असतो. फुलांवर मधमाश्या गर्दी करतात. फुलांचा उमलण्याचा आणि मिटण्याचा काळ हा कमळ फुलांसारखाच असतो. म्हणजे सकाळी आठ साडेआठ ते दुपारी साडेतीन-चार पर्यंत. कुमुदिनी मध्ये काही फुलं ही रात्री उमलतात. त्यांना "नाईट ब्लुमर" म्हटलं जातं. सर्वांनाच परिचित असलेला मखाना, हा कुमुदिनीचाच प्रकार आहे. कुमुदिनीचे "ट्रॉपिकल" व "हार्डी "असे दोन प्रकार आहेत. हे प्रकार फुलं व पानांवरून सहज ओळखता येतात. ट्रॉपिकलचे फुल सहा ते नऊ इंच देठ असलेले पाण्यापासून उंच उमलतात. पान पातळ व कडा कतरी असतात. "हार्डी" कुमुदिनीचे फुल पाण्यावर तरंगत उमलतात. पानं जाडसर व कडा गुळगुळीत असतात. ट्रॉपिकल ह्या प्रकारात खूप सार्‍या रंगछटा असलेले फुल असतात. त्या तुलनेत हार्डी मध्ये फुलांचे कमी रंगाचे प्रकार असतात कुमुदिनीचे मूळ लांबट किंवा कंदाच्या स्वरूपात असतात. कुमुदिनी एक उपयुक्त वनस्पती आहे. याचा उपयोग आयुर्वेदामध्ये व सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो. कुमुदिनी पाणी शुद्धीकरण करण्याचे काम करते व जल पर्यावरणीय परिसंस्थे साठी उपयुक्त जलवनस्पती आहे.

identity footer