कदंब

neolamarckia cadamba

मध्यम, अधिक, पावसाच्या प्रदेशात, चांगल्या ओलावा टिकून ठेवणाऱ्या जमिनीत, भरभर वाढणारा, पानगळी वृक्ष. कंदब वृक्ष सतर ते ऐंशी फुट उंच वाढतो. खोड गोलाकार, सरळ वाढणारे. भेगाळलेली साल गडद करड्या रंगाची असते. त्याच्या फांद्याची रचणा वैशिष्ट पूर्ण असते. गोल जिन्यासारखी (spiral staircase) म्हणजे त्याच्या फांद्यावर पाय ठेवून चडत गेल की खोडाला गोल चक्कर होत आपण वरच्या भागाकडे जातो. खालच्या फांद्या लांब पर्यंत आडव्या पसरलेल्या असतात व टोकाकडेच्या फांद्यांची लांबी कमी होत जाते. जसजसा वृक्ष उंच वाढतो त्याच्या खालच्या लांब फांद्या वाळून गळून पडतात. त्यामुळे हा वृक्ष रस्ताच्या कडेने किंवा वाहनतळा जवळ लागवड करु नये. अपघात होण्याची शक्यता असते. पान मोठी साधी, समोरासमोर येणारी, उठावदार शिरा असलेली, लंबवर्तुळाकार व टोकदार असतात. पानगळ उन्हाळ्याच्या सुरुवातीला होते व लगेच नवीन पालवी फुटते. पावसाळ्याच्या सुरुवातीला पानांच्या बेचक्यात गोलाकार हिरवी पुष्पगुच्छ दिसू लागतात. हळूहळू पुष्पगुच्छांवर असंख्य, सुष्म, पिवळसर केशरी रंगाचे फुलं फुलू लागतात. दिड इंचापर्यंत त्याचा व्यास असतो. साधारण ऑगस्ट अखेरपर्यंत त्याचा बहर सुरू असतो. फुलं गळून गेल्यानंतर गोलाकार फळे ही संयुक्त फळे असून ती असंख्य लहान फळांनी बनलेली असतात. फळांपासून लोणच बनवतात. फळ पक्षांना व काही वन्यजीवांना आवडतात. औषधी गुणधर्म असलेला वृक्ष आहे. फक्त लागवड करताना याची योग्य ठिकाणी लागवड होणं अपेक्षित आहे.

identity footer