मध्यम, अधिक पावसाच्या ठिकाणी कोरड्या, उष्ण हवामानात वाढणारा वृक्ष. बारतोंडी मुरमाड, दगड, गोटे असलेल्या जमिनीत वाढते. काही ठिकाणी झाड वेडे वाकडे वाढलेले दिसते. बारतोंडी वृक्ष साधारण विसएक फुटापर्यंत वाढतो. खोडा वरची साल खडबडीत खपल्या निघालेले असते. पान मोठी लंबगोलाकार थोडं टोक असलेले, लवयुक्त असतात. पान मोठी असल्याने झाड पानांनी भरगच्च भरलेली दिसतात. जमिनीच्या प्रकारानुसार पानगळ कमी अधिक प्रमाणात होते. पानांच्या बेचक्यात पांढरी सुवासिक दहा ते बारा फुले एकत्रितरित्या एप्रिल ते जुलै पर्यंत येतात. एकत्रित आलेली फुलं गळून पडल्यानंतर त्या ठिकाणी गोलसर फळ येतात. फळ फिक्कट हिरव्या रंगाची व गर्द हिरव्या रंगाच्या सीमारेषेने षटकोनी आकाराचे वाफे पडल्यासारखे फळधारणा होते. फळांवर पडलेल्या वाफेच्या मध्यभागी गळून पडलेल्या फुलांच्या देठाचा पिवळसर ठिपका दिसतो. या स्थितीत फळांची रचना बघण्यासारखी असते. फळ पिकल्यावर काळी पडतात अनेक एकत्रित फुलांन पासून एकाच फळांमध्ये रूपांतर होणार बारतोंडी हे झाड आहे. ह्याच्या मुळापासून नैसर्गिक लाल रंग मिळतो. बारतोंडीला आयुर्वेदिक महत्त्व आहे. बरेच लोकं नोनी वृक्षाला बार तोंडी वृक्ष म्हणून संबोधतात.