कळम

mitragyna parvifolia

डेरेदार उंच वाढणारा पानझडी जंगलात आढळणारा कळम वृक्ष. कदंब, हेद ह्या वृक्षांच्या कुळातील हा वृक्ष. फिक्या रंगाचे चट्टे असलेले काहीसे खडबडीत खोड असते. मार्च महिन्यात याची पानगळ होते. साधारण एक दीड महिन्यात याला नवी पालवी फुटण्यास सुरुवात होते.‌ दोन ते अडीच सेंटीमीटर व्यासाचे, गोलाकार फुल उन्हाळ्याच्या शेवटी म्हणजेच जुन ते साधारण ऑगस्टपर्यंत येतात. फुलांचा आकार हा कदंब व हळदु या वृक्षा सारखाच आहे फक्त याची फुलं कदंबाच्या फुलांपेक्षा लहान असतात. पिवळ्या रंगाच्या छोट्या बाॅलला पांढऱ्यारंगाचा गुल असलेल्या काड्या पेटीतील गुलकाडी सारख्या दिसणाऱ्या पण त्यापेक्षा बारीक काड्या, फुलाला टोचल्यासारख्या वाटतात. फुलांना मंद सुगंध असतो. फुलांवर मधमाशांची भरपूर रेलचेल असते. कमांडर जातीच्या फुलपाखरांसाठी उपयुक्त असा हा वृक्ष, याच्या पानांवर कमांडर फुलपाखराच्या अळ्या चांगल्या पोसल्या जातात.औषधी गुणधर्म असलेला हा पर्यावरण पूरक वृक्ष आहे. दारणा धरणा जवळ ढेरेदार उंच वाढलेले वृक्ष आहेत. शहर व परिसरात याची योग्य ठिकाणी लागवड केल्यास आपल्या शहराच सौंदर्य वाढविण्यास नक्कीच मदत होईल.

identity footer