रानतुळस

mesosphaerum suaveolens

जंगली तुळस / रानतुळस, ही अमेरिकन उष्णकटिबंधीय प्रदेशातील सात ते आठ फूट उंच वाढणारे झुडूप. काही ठिकाणी ह्या झुडपाला जमीनी पासूनच बऱ्याच फांद्या फुटलेला असतात, तर काही ठिकाणी ते एकच काडी सरळ उंच वाढते. काडी चौकोनी आकराची, केसाळ असते. ह्याची पान, देठ, फुलांचे आवरण केसाळ असते. पानांना एक उग्र वास असतो. काही क्षणासाठी तो वास छान वाटतो, पण नंतर अति उग्रतेमुळे त्रासदायक ठरतो. वाळलेल्या फाद्यांना बारीक हलके, दाट केसाळ काटे असतात. जांभळ्या रंगाच्या फुलांचे तुरे पानांच्या बगलेत येतात. फुल गळून गेलेल्या ठिकाणी फळ म्हणजे बारीक बोंड येतात. बोंड उकलुन त्यातून बारीक काळ्या बिया बाहेर पडतात. ह्या बियांचा सब्जा म्हणून वापर केला जातो. ह्याला पाळीव जनावरे किंवा तृणभक्षी वन्यजीव खात नाही, त्यामुळे त्याच नैसर्गिक नियंत्रण होत नाही. हे झुडूप सुरवातीला एकट दुकट वाढलेल दिसत. पण पुढच्याच दोन एक वर्षात, हे दाटी ने वाढुन तो भाग व्यापून टाकते. त्यामुळे तिथल्या स्थानिक उपयुक्त वनस्पतीन वर परिणाम होतोच, पण वन्यजीवांच्या त्या भागातील हालचालींवर पण बाधा येते. अश्यावेळी वन्यजीव ते ठिकाण सोडुन सुरक्षित परीसरात जातात. अश्या विविध प्रकारच्या आक्रमक परदेशी वनस्पतींमुळे, वन्यजीवांना आपल्या शाश्वत सुरक्षित अधिवासाला सोडून मानवी वस्तीमध्ये फिरकाव लागत आहे. आपल्या जंगलांना विविध परदेशी उपद्रवी वनस्पतींचे आव्हान निर्माण होऊन, तेथील पर्यावरणी परिसंस्थेवर घातक परिणाम झाले आहेत. अश्या विविध प्रकारच्या उपद्रवी वनस्पतींची जनसामान्यांना कल्पना नाही. त्यासाठी त्याची ओळख करून देण्यासाठी त्याच्या घातक परिणाम विषयी एकदाच नाही तर वेळोवेळी प्रबोधन करण्याची गरज आहे. अश्या आपल्या कमी होत चाललेल्या जंगल परिसरात, जसे विविध प्रकारे मानवी हस्तक्षेप जंगलाच्या बाहेरच्या बाजूने चौफेर वाढतोच आहे, हे आपल्याला लक्षात येते. पण जंगलात जो काही उपद्रवी परदेशी वनस्पतींपासुन धोका निर्माण झाला आहे, तो लक्षात घेऊन ते नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

identity footer