कुंकू

mallotus philippensis

कमी, मध्यम पावसाच्या ठिकाणी वीस ते पस्तीस फूट वाढणारा सदाहरित,मध्यम आकाराचा, भरगच्च पानांनी भरलेला वृक्ष, महाराष्ट्रात साधारण सर्व वनात किंवा काही भागात रस्त्याच्या कडेला आढळतो. काही ठिकाणी आखूड वेडे वाकडे खोड काही ठिकाणी सरळ वाढलेल दिसुन येते. याची पानं टोकदार खालच्या भागात गोलाकार व पानाच्या कडा थोड्या नागमोडी असतात. वातावरणाच्या व जमीनी अनुसार पानांच्या आकारामध्ये फरक पडतो. पानांचा वरचा भाग गर्द हिरवा व खालचा भाग फिकट हिरवा असतो. फुल हिवाळ्यात येतात. पिवळ्या पांढऱ्या बारीक फुलांचे लाल ग्रंथी असलेले तुरे असतात.वाटण्याएवढी किंवा वाटण्यापेक्षा काहीशी मोठे असलेले तीन कप्प्यांचे फळ फळांवर तांबडी सहज हाताला लागणारी कुंकवा सारखी पावडर असते.फळ फेब्रुवारी मे मध्ये येतात.हिरव्या गच्च पानांनी भरलेलं काही ठिकाणी फुल सुकत चाललेले तुरे, त्यांना लागलेले फळ, तर काही ठिकाणी भरगच्च फळांनी भरलेले झाड बघण्यास खूपच छान वाटते.फळ औषधी गुणधर्म असलेले विविध औषधांमध्ये त्यांचा वापर होतो.जैवविविधता टिकवण्यासाठी वृक्ष लागवड करताना अशा या पर्यावरण पूरक वृक्षांची लागवड करणे ही काळाची गरज.

identity footer