मध्यम,जास्त पावसाच्या प्रदेशात वाढणारा. डोंगर उताराला, मुरमाड, मध्यम प्रतीच्या जमिनीत वाढतो. मध्यम उंचीचा, आटोपशीर पण दाट पर्णसंभार असलेला, सदाहरित वृक्ष. खोड सरळ असते. खोडाला बर्याच फांद्या फुटतात. पान मोठी आठ ते दहा इंच लांब,पत्त्यातल्या बदामाच्या आकाराची पण बदामा सारखी खाच नसते, गोल असतात. पानांचे देठ सहा ते आठ इंच लांब व पानाला खालच्या बाजूने साधारण दोन ते तीन इंच गोलसर भागाकडुन आत मध्ये खालुन चिटकलेले असते. नवीन पानांचं देठ लालसर असते. पानांला खालुन देठ जिथे चिटकलेले असते, तिथुन पानांची काहीशी लालसर छटा असलेली शिर टोका पर्यंत स्पष्ट दिसते. पानांनची गर्दी फांद्यांच्या शेंड्याकडे असते.चादवा हा त्याच्या पानांन च्या रचने मुळे इतर झाडांन मधुन उठून दिसतो. सुक्ष्म फुलांचे असंख्य तुरे जानेवारीत फेब्रुवारी दिसु लागतात. छोटी गोल फळ उन्हाळ्यात येतात.परिपक्व फळ जामुणी रंगाची असतात. औषधी गुणधर्म असलेला हा वृक्ष आहे. त्रंबकेश्वर च्या परिसरात काही ठिकाणी हा वृक्ष दिसतो. आता संख्येने बराच कमी झाला आहे. इगतपुरी , त्रंबकेश्वर इत्यादी परिसरात फार्म हाऊसेस मध्ये परदेशी पर्यावरणाला हानिकारक झाड लावण्यापेक्षा, चांदवा सारखे प्रदेशनिष्ठ वृक्षांची लागवड केली तर स्थानिक पर्यावरणीय परिसंस्था अबाधित राखण्यासाठी मदत होईल, परिसर पण छान दिसेल व ह्या वृक्षाची संख्या वाढण्यास मदत होईल. मी वृक्ष परिचय केंद्रामध्ये एक व नासिक देवराई येथे बरेच रोप लावली होती आता छान वाढले आहेत.