मध्यम पावसाच्या ठिकाणी झटपट वाढणारा मध्यम आकाराचा, भरगच्च पर्णसंभार असलेला वृक्ष. नैसर्गिकरित्या डोंगर उतारावर दिसून येतो. ईतर वृक्षांच्यामानाने, वारंग वृक्षाचे आयुष्यमान कमी असते.
खोड सरळ वाढणारे, तपकिरी राखाडी रंगाचे असते. आठदहा फुटाच्या उंचीवर फांद्या फुटलेल्या असतात. पानं बुडा कडे बदामाच्या आकाराची शेंड्याकडे कडांना शेंड्याच्या बाजुला कोन निघालेले व शेंडा टोकदार असते. पानांना वरच्या बाजूस हलकी लव असते. पानं खालच्या बाजूने फिकट हिरव्या राखाडी, रंगाची व स्पष्ट शिरा असलेली असतात. फुलं पावसाळ्यात ऑगस्टमध्ये येण्यास सुरुवात होते. साधारण ऑक्टोबर पर्यंत फुलांचा भर सुरू असतो. पाच केसाळ युक्त पाकळ्या असलेली मध्यभागी नलिका युक्त व पाच जाडसर पुंकेसर असलेले पांढरे फुलं व काही झाडांवर मध्यभागी लालसर छट्टा असलेले फुलं दिसून येतात. मातीच्या सुपेकते नुसार पानगळ होते. बर्याच ठिकाणी हिवाळ्याच्या शेवटी झाड पर्णहीन होते. पर्णहीन झाडावर चार पसरलेले पंख व मध्यभागी बोंड निघालेले,भिंगरीसारखी अर्धा इंच छोटी, पण सुंदर रचनेची फळ, लटकलेली असतात. फळ नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये परीपक्व होतात. परिपक्व फळ पुढील बराच काळ झाडावर लटकलेली असतात.
औषधी गुणधर्म असलेला, पर्यावरणीय परिसंस्था अबाधित ठेवण्यासाठी उपयुक्त वृक्ष.