कमी,मध्यम पावसाच्या प्रदेशात, मुरमाड व पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढणारा वृक्ष.भोरसाल हा मोठा होणारा वृक्ष, ह्याचा पर्णसंभार अवाढव्य असतो. हा पानगळ होणारा वृक्ष आहे. जानेवारी ते फेब्रुवारीत ह्याची पानगळ होते. पानगळ होतांना याची पुर्ण पान एकाच वेळेस पिवळ्या रंगाची होतात. लांबुन बघितल्यास झाडाला असंख्य पिवळ्या फुलाचे गुच्छ असल्या सारखे वाटते.त्यावेळेस झाडाचा नजारा मोहक दिसतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेंड्याला नवीन पालवी फुटते त्यावेळेस, पानांनचा खालचा भाग तांबुस रंगाचा असतो, पानांनच्या जाड पिवळसर शिरा उठून दिसतात. पुर्ण वाढ झालेली पान हिरवी, मोठी अंडाकृती पण टोकदार असतात. असंख्य छोटी राई येवढ्या आकाराचे पांढर हिरवे मध्ये भागी टाचणी टोचल्यासारख्या फुलांचे मोठे तुरे जुलै ऑगस्ट मध्ये येतात. फुलांना मंद सुगंध असतो. फुल राई सारखे तपकिरी पडतात त्यावेळी मोठे पण नाजूक तुरे छान दिसतात. एखाद्या बाटली आतुन घासण्याच्या ब्रश सारखे दिसतात. कॅप्सूल सारखी, पण टोकाला थोडी निमुळती फळ हिवाळ्यात येतात. औषधी गुणधर्म असलेला हा वृक्ष आहे. ह्या पर्यावरण पूरक वृक्षाची लोकांना जास्त माहिती नसल्याकारणाने वृक्षारोपण करताना याची लागवड फारच कमी प्रमाणात होते.