पापडा

holoptelea integrifolia

कमी, मध्यम जास्त पावसाच्या प्रदेशात डोंगर उतारावर, कड्या कपारीत वाढणारा पानगळीचा वृक्ष. मुरमाड,खडकाळ हलक्या जमिनीत वाढतो. अनुकुल ठिकाणी पंचावन्न ते साठ फूट उंच वाढणारा विशाल पर्णसंभार असलेला हा वृक्ष दिसून येतो. फांद्या सरळ वाढतात व शेंडे जमिनीकडे झुकलेले असतात.खोड सरळ,पंधरा वीस फुटांवर फांद्या फुटतात. खोडाची साल करड्या राखाडी रंगांची असते. देठ असलेली पान एक आड एक अशी, तीन ते पाच इंच लांब,पसरट, टोकाकडे निमुळती टोकदार असतात.पान गर्द हिरवे असतात.पानगळ हिवाळ्यात होते. वृक्ष निष्पर्ण होतो. हिवाळ्याच्या शेवटी हिरवट पिवळ्या रंगाचे सुक्ष्म फुलांचे तुरे येतात. मार्च एप्रिल मध्ये झाड चपट्या गोल हिरव्या चकचकीत फळांच्या असंख्य झुपक्याने लगडलेले असते. त्यावेळी तांबूस रंगाची चकचकीत कवळी पालवी झाडावर येते. फळ एप्रिल मे मध्ये पक्व होतात. परिपक्व झाल्यावर फिकट तपकिरी रंगाची होतात. फळ म्हणजे सादारण एक रुपयाचे नाण्याच्या आकारचे असते. मध्यभागी अर्धा सेंटीमीटर च्या आवरणात बी असते, व बी च्या अवतीभवती गोलाकार पातळ झालरी सारखा पापुद्रा असतो फळ खुपचं वजनाने हलके असते.फळांच्या चकती सारख्या रचनेमुळे वाऱ्याच्या झोताने फळ दूरपर्यंत उडत जातात. औषधी गुणधर्म असलेला हा वृक्ष आहे. विशाल पर्णसंभार मुळे, उंच ठिकाणी घरटे करणार्या पक्षांना उपयुक्तत, काही ठिकाणी याच्यावर संख्येने आग्या मोहोळ दिसून आले आहेत.

identity footer