मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात वाढणारे बहुशाकिय, पानगळ होणारे चिकवर्गीय झुडूप. पानगळ हि जागा व वातावरणाच्या परिस्थिती नुसार होते. काही ठिकाणी आठ ते दहा फूट छोटेखानी वृक्षा सारखे दिसुन येते. पांढऱ्या कुड्याची झुडप बऱ्याच ठिकाणी संख्येने उगलेले दिसतात. नासिक वनराई येथे,उष्ण, कोरड्या हवामानात, हलक्या प्रतीच्या जमिनीत काही रोपांची लागवड करून संवर्धन केले आहे.चांगल्या प्रकारे वाढले आहेत.पान समोरासमोर येणारी व विरुद्ध दिशेला पसरलेली असतात. छोट्या फांद्यांच्या शेंड्याला पानांनी गर्दी केलीली असते. पान साधारण पाच इंच पासून आठ इंचा पर्यंत लांब व तीन ते पाच इंच रुंद , टोकाकडे निमुळती असतात. पानांनवर शिरा व उपशिरा स्पष्ट दिसतात. साधारण एक इंच व्यासाची सुंदर फुल उन्हाळ्याच्या सुरुवातीला गुच्छाने येण्यास सुरूवात होते. फुलांना छान सुगंध असतो. फुल पांढरीशुभ्र, पाच लंबगोलाकृती पाकळ्या पसरलेल्या.फुलांच्या आकारा बघुनच कानातल्या कुड्यांचा आकार बनवलेला आहे असे वाटते. फुलांचा हंगाम जुन जुलै पर्यंत असतो. फळ म्हणजे एकाच देठाला दोन गोल, बारीक नळी सारख्या दिसणाऱ्या शेंगा एक ते दिड फूट लांबीच्या व अर्धा सेंटीमीटर जाडीच्या वक्र आकार होऊन टोकाकडे एकमेकाला खेटून असतात. शेंगा गर्द हिरव्या,असतात. शेंगा पावसाळ्यात येण्यास सुरुवात होते. शेंगा हिवाळ्याच्या शेवटी परिपक्व होऊन उकलतात. औषधी गुणधर्म असलेले झुडुप किंवा छोटेखानी वृक्ष. ह्याची लागवड, बंगल्यामध्ये, इमारतीच्या आवारात केल्यास नक्कीच परिसराच सौंदर्यात वाढ होण्यास मदत होईल.