कमी व मध्यम पावसात वाढणारे मोठे झुडूप. मुरमाड जमिनीत, उष्ण भागात पण चांगल्या प्रकारे वाढते. अल्प काळासाठी पानगळ होते.पान कवळी असतात तेव्हा तांबुस हिरवट रंगाची असतात. नंतर पुर्ण हिरवी होतात. पान फांदीला एकाआड एक असतात. देठाकडे व मध्यभागी पसरट टोकाकडे निमुळती टोकदार असलेली, कडा दातेरी असतात. पावसाळ्यात फुल येतात नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत फुलण्याचा काळ असतो. दोन तिन लाल रंगाची फुल, पानांनच्या बेचक्यात येतात. पिवळ्या रंगाच्या कोनात खोचल्यासारखी फुल वाटतात. कोनाच्या तोंडाजवळच्या पाकळ्या मोठ्या, दोन दिशेला पसरलेल्या, व पुढील तीन पाकळ्या लांबट गोलाकार असतात.तिन पाकळ्यांच्या मधुन लांबट नलीका असते. कोमेजतांना फुलांचा रंग फिकट निळसर होतो. फुलांवर मधुरस पिण्यासाठी मध खाणारी पक्षी दिसू लागतात. फळ म्हणजे पाच सहा शेंगांना घट पिळ दिल्या सारखे असते. मुरुड शेंग म्हणजे पुर्वी आजीच्या बटव्यातली वनौषधी.बाळगुटी म्हणून लहान मुलांना उगाळून देतात. अश्या या निसर्गाचं संतुलन राखणाऱ्या, वनऔषधी म्हणून उपयोगी पडणाऱ्या वनस्पतींची रोपे येत्या पावसाळ्यात वृक्षारोपण करताना आवर्जून लावावेत.