बेडकीचा पाला हा बहुवर्ष वेल आहे. मध्यम अधिक पावसाच्या प्रदेशात वाढणारा वेळ. वीस ते पंचवीस फुटापर्यंत इतर वृक्षांच्या आधारे त्याची वाढ होते. पानांनी भरगच्च भरलेला, सदाहरित वेल. मानव समोरासमोर संयुक्त पद्धतीचे असतात. पान देठाकडे पसरट व पुढच्या भागाकडे टोक निघालेले असतात. पान साधारण सव्वा ते दीड इंच लांब व एक इंच रुंद असतात. पानांमध्ये विशेष नैसर्गिक गुण आहे. पान चावून चगळल्यास पुढील अर्धा तास कुठल्याही गोड पदार्थाची चव लागत नाही. त्यावेळी साखर खाल्ल्यास बेचव दाणे खाल्ल्यासारखे वाटते. म्हणून याला गुड मारी अथवा मधून अश्विनी या नावाने ओळखले जाते. फुलं खूप छोटीशी पिवळसर रंगाची असतात. फुल पाच ते दहा च्या संख्येने पानांच्या बगलत येतात. फुलांचा आकार म्हणजे बारीक कानातल्या कुड्यांसारखा असतो. फुल जुलै-ऑगस्ट मध्ये येतात. फळ अडीच ते तीन इंच लांब व एक ते दीड सेंटीमीटर रुंद व टोकाकडे निमुळती झालेली असतात. फळधारणा पावसाळ्याच्या शेवटी सुरू होते. औषधी गुणधर्म असलेला हा बहुगुणी वेल आहे.