फालसा

grewia asiatica

फालसा हा छोटेखानी वृक्ष.कमी मध्यम पावसाच्या ठिकाणी येणारा. मुरमाड जमिनीत,कोरड्या हवामानात वाढणारा, पानगळ होणारा वृक्ष.‌ जमिनीच्या प्रकारानुसार सादारण दहा ते वीस फुटापर्यंत वाढ होते. कवळ्या फांद्या बारीक केसाळ युक्त लव असते.झाडाला पान काही लहान पण जास्तकरून तळहाता येवढी किंवा काही थोडी मोठी, कडा कतरलेल्या सारखे असतात.पान पसरट पण टोकदार असतात. हिवाळ्याच्या शेवटी पानगळ होते. मार्च एप्रिल मध्ये नवीन पालवी फुटते. कवळी पालवी फुटते त्यावेळेस पान तांबूस रंग छटा असलेले , नवीन पालवी फुटते त्यावेळेस झाड छान दिसतात. पान लवयुक्त असतात. पिवळी धमक सुंदर रचनेचे फुल उन्हाळ्यात येतात, फुल झुन झाल्यावर लालसर होतात.एकाच वेळी पिवळी व लाल रंगाची फुल झाडावर दिसतात. लाल होऊन गळालेल्या फुलांच्या जागेवर कोवळी हिरवी केसाळ लवयुक्त, थोड्याशा लांबट देठा मुळे गुल काडी सारखी दिसणारी फळ येतात. पिकल्यावर चाॅकलेटी काळसर रंगाची असतात. फळ म्हणजे रान मेवा, चविष्ट गोडसर असतात. पक्षांना फळ आवडतात. नाशिक देवराई येथे मोर फळ खाण्यासाठी फांद्या वर बसण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्या वजनाने फांद्या तुटतात.‌ तुटून लोंबलेल्या फांद्याचे फळ खातांना मोरांना बघुन खुपच भारी प्रसंग होता माझ्यासाठी. फालसा औषधी गुणधर्म असलेला, बहुगुणी, पर्यावरण पूरक वृक्ष आहे. फालसा सरबत हे पौष्टिक पेय आहे.

identity footer