सर्व वनात आढळणारा, कमी मध्यम पावसाच्या प्रदेशात, दमट वातावरणात, उष्णकटीबंधीय, कोरड्या हवामानात पण चांगल्या प्रकारे वाढणारा, जानेवारी फेब्रुवारीत पानगळ होणारा, वृक्ष. पिवळसर पांढरट रंगाचे खोड, उंच सरळ वाढणारे असते. साल बऱ्यापैकी मऊ असते. पान हाताच्या पंजा एवढी मोठी हृदयाकृती असतात. पाच पाकळ्यांची तपकिरी पिवळा रंगाचे एक ते दीड इंचाची फुले, पानगळी नंतर वृक्षावर दिसु लागतात. वरच्या दोन पाकळ्या छोट्या जवळ जोडलेल्या, त्याच्यानंतर काहीशा मोकळ्या आणि मोठ्या व मधली पाकळी लांबट अशा वैशिष्ट्यपूर्ण आकाराचे फुल असतात. फुल उभे पकडल्यास एखाद्या भारदस्त सिंहासनासारखे वाटते. फुलांचा बहार उन्हाळ्याच्या सूरवातीला सुरू होतो, व साधारण एप्रिल मध्या पर्यंत असतो. फुलावर भुंगे व मधमाशा दिसू लागतात. बोरासारखी पण थोडी लांबटगोल, पिकल्यावर तुरट गोड लागणारी फळ, मे जून मध्ये येतात. फळ पोपटांना आवडतात. विशेषता पहाडी पोपटांना अधिक आवडतात. फळांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदिक औषध दशमुळारिष्ट मध्ये शिवणा मुळ वापरली जातात. या झाडाला वाढ चांगली आहे. पण काही ठिकाणी झाड लहान असताना मुळांना व खोडाला कीड लागते. पर्यावरणीय परिसंस्थेला अबाधित ठेवण्यासाठी, वृक्षलागवड करताना त्याची लागवड करणे योग्य आहे.