काकड

garuga pinnata

मध्यम व जास्त पावसाच्या प्रदेशात, मुरमाड, खडकाळ, डोंगर उताराला वाढणारा पानगळीचा वृक्ष. चाळीस ते पन्नास, फुट वाढणारा वृक्ष. खोड सरळ उंच वाढणारे पांढरट तपकिरी रंगाचे असते. सालीचा रस चिकट असतो. लांबुन बघितल्यास ह्या वृक्षाची ओळख नसलेल्यांना कडुनिंबाचे झाड वाटते. पान, कडुनिंबाच्या पांनांन सारखीच रचना आहे. पण काकडची पान थोडी मोठी असतात. पानांचा झुपका फांद्यांच्या शेंड्याला असतो. पर्णिका विष्म संख्येने असतात, पानांच्या टोकाला एक पर्णिका असते.पर्णिका जाडसर व कडा दातेरी असतात. जसे उंबराच्या पानांवर बारीक बारीक पिवळसर काळे फोड असतात.तसेच काकडच्या काही पर्णिकांवर मोठे लाल फोड दिसुन येतात. ती एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे ह्या झाडाची. बरेच लोकांना वाटते ते फळ आहे, पण ती एक प्रकारची किड किंवा पांनांन वर येणारा रोग आहे. त्याला स्थानिक भाषेत ढेकुण रोग म्हणतात. पण त्यामुळे झाडाला कुठलीही हानी होत नाही. पण तो लाल फोड झाडाचे एक प्रकारे सौंदर्य खुलवतो.जानेवारी फेब्रुवारीत पान गळ होते. उन्हाळ्याच्या सुरुवातीला नवीन पालवी फुटते. कवळ्या पांनांन वर दाट लव असते. फेब्रुवारी मध्ये,सुगंधी छोट्याशा पांढरट पिवळसर फुलांचा मोहर , कडुनिंबाच्या झाडावर दिसतो तसाच फुलोरा. फुलांनवर मधमाश्या गर्दी करतात. फुलांचा बहर एप्रिल अखेर पर्यंत सुरू असतो. हिरवी फळ उन्हाळ्याच्या शेवटी येण्यास सुरुवात होते. फळ साधारण दोन सेंटीमीटर गोल असतात. हिरवट पिवळ्या रंगाची अर्ध परिपक्व झाल्यावर फळ आबंट लागतात. पावसाळ्यात परीपक्व होतात.ह्या वृक्षापासून डिंक मिळतो. काकड औषधी गुणधर्म असलेला पर्यावरण पूरक वृक्ष आहे.

identity footer