डिकामली

gardenia resinifera

डिकमली हा एक छोटा वृक्ष आहे. काही ठिकाणी तो झुडपा सारखा दिसतो. मध्यम पावसाच्या ठिकाणी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढणारा वृक्ष. जमिनीच्या प्रकारानुसार काही ठिकाणी मोठ्या झुडपा सारखा वाढलेला दिसतो. पानगळ होणारा वृक्ष. पानगळ काही ठिकाणी अल्प काळासाठी होते. तर काही ठिकाणी नवीन पालवी येण्याचा कालावधी थोडा लांबतो. पानगळ उन्हाळ्यात होते. पान एकमेका समोर येतात, पान फांद्याना चिकटलेली बिगर देठाची असतात. पान दोन्ही बाजूने निमुळती, चकचकीत व गुळगुळीत असतात. पान साधारण सहा ते आठ इंच लांब व चार इंचाच्या आसपास रुंद असतात. नवीन पान उमलण्या पुर्वी, त्याच्या टोकाला पिवळसर रंगाचा चकचकीत दव असल्या सारखा डिंकाचा थेंब असतो. हाच डिकामली चा उपयुक्त, औषधी गुणधर्म असलेला डिंक. डिंकाला एक प्रकार चा सुगंध असतो. मे जुन ह्या दरम्यान वृक्ष पांढऱ्या मोठ्या पाच पसरट पाकळ्या असलेल्या फुलांनी बहरलेला असतो. फुल सुवासिक असतात. टोकाकडे पाच कंगोरे असलेले एक ते सव्वा इंच लांबट फळ पावसाळ्यात येतात.आयुर्वेदामध्ये विविध आजारांसाठी औषधात वापरला जाणारा डिंक मिळणारा वृक्ष. अतिशय उपयुक्त असा हा छोटेखानी देखणा वृक्ष परस बागेत पण लावण्यास योग्य आहे.

identity footer