पायरच्या चार प्रकारांच्या वृक्षांची अनेक रोप लावुन संवर्धन मी केले आहे. अंबापायर वृक्ष हा पायर कुळातील एक वृक्ष चीक वर्गीय वृक्ष.अंबापायर हा मध्यम व जास्त पर्जन्यमान होणाऱ्या प्रदेशात वाढणारा वृक्ष. मुरमाड, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत, कोरड्या, उष्ण हवामानात पण वाढतो. तिस ते पस्तीसफुट, उंच वाढणारा, डेरेदार पर्णसंभार असलेला, अल्पकाळ पान गळ होणारा वृक्ष. ह्रदयाकृती पान, टोका कडे थोडेसे लांबट टोक निघालेल पान असतात. पान साधारण सहा ते आठ इंच लांबट तिन ते चार इंच रुंद असतात. पानगळ झाल्यानंतर नवीन येणाऱ्या लालसर पालवी मुळे झाड खुप सुंदर दिसते. पान गुळगुळीत असतात. पानानवर पांढरट शिरा उठून दिसतात. उन्हाळ्यात एक ते दिड सेंटीमीटर चे गोल पण माथा थोडा दाबल्यासारख, छोट्या देठाची फळ दिसू लागतात. फळ साधारण फांद्यांना चिटकुनच येतात. मे जुन मध्ये फळ पिकतात. आईन उन्हाळ्यात परीपक्व झालेली याची फळ म्हणजे पक्षांसाठी मेजवानीच असते. फळ खुप आवडतात. पक्षाच्या विष्टेतून याचा प्रसार होत असतो. पर्यावरणीय महत्त्व असलेला जैवविविधतेची साखळी टिकून ठेवण्यासाठी निसर्गातील महत्त्वाचा वृक्ष.