आस्टा/नंदवृक्ष

ficus rumphii

आस्टा पिंपळाचा प्रकार, पांढरट हिरवट खोड असलेला मोठा वाढणारा वृक्ष. कमी अधिक पावसाच्या प्रदेशात वाढणारा वृक्ष. ह्या वृक्षाची तण मूळ खोडाजवळ जमिनीलगत जाळी सारखी पसरलेली असतात. मुळ खूपच चिवट असतात. पानपिंपळासारखेच पण वरुन गर्द हिरवे व खालून फिकट हिरव्या रंगाचे असतात. गर्द हिरवे काहीशे चमकदार पानांवर पिवळसर रंगाच्या रेषा उठुन दिसतात. उन्हाळ्यात पानगळ होते. पानगळीच्या काळ जमिनीच्या प्रकारानुसार कमी जास्त असतो. पानगळी नंतर फांद्यांना चिटकुनच फळ येतात. फळ पक्षांना आवडतात. बहुगुणी असे हे आपले वृक्ष, लोकांची यांच्या प्रती आज्ञा मुळे वृक्ष लागवड करतांना दुर्लक्षित राहिले आहेत.

identity footer