पिंपळाचे झाड माहीत नाही अस कोणी सापडण कठीण आहे. पिंपळाचे धार्मिक, पर्यावरणीय, औषधी महत्त्व हे सर्वसृत आहे. बऱ्याच जातीच्या पक्षांचा अश्रयस्थानाचा हा वृक्ष. पिंपळाच्या पानांनची रचना म्हणजे हृदयाकृती पानाला लांब टोक निघालेल. बराच वेळा आपण व्हाट्सअप च्या माध्यमातून पिंपळ हे चोवीसतास ऑक्सिजन देणारे झाड असं वाचल असेल.खरतर जगाच्या पाठीवर असं कुठलंच झाड नाही कि ते चोवीस तास ऑक्सिजन देत. पिंपळ हे त्याच्या पानांच्या रचनेमुळे पानांच्या संख्येमुळे, त्याचा पर्णसंभार चा विस्तार आहे त्यामुळे ते जास्त प्रमाणात ऑक्सिजन देत. मुख्य म्हणजे पिंपळ हा पानगळ होणारा वृक्ष आहे हे बऱ्याच जणांना माहिती नाही. जमिनीच्या प्रकारानुसार पानगळीच्या काळ कमी जास्त प्रमाणात असतो. पिंपळाचे पण प्रकार आहेत. हे इथे आपल्याला माहीत करून घ्यायचे आहेत.