मध्यम आधिक पावसाच्या परिसरात डोंगराला मोठा उंच वाढणारा साधाहरीत, चीकवर्गीय विशाल वृक्ष. पर्णसंभाराचा विस्तार मोठा पण काहिसा विरळ असतो. पूर्ण वाढ झालेल्या वृक्षाच्या खोडाभोवती जमिनीलगत तणावमुळं (बट्रेस रुट) जमीनीवर बऱ्याच अंतरापर्यंत पसरली असतात. तणाव मुळ खोडा जवळ पाच ते सहा फुट उंच असतात. त्यामुळे कपारीसारखी जागाखोडाजवळ तयार झालेली असते. साल करड्या रंगाची गुळगुळीत असते. खोडावर बऱ्याच उंचावरून फांद्या पसरलेल्या असतात. पान एकांतरित, लांबट चार ते सहा इंच लांब व टोकला थोडे लांबट टोक निघाले असते. पान वरून गर्द हिरवी चकाकणारी व खालच्या बाजूने पोपटी रंगाची असतात. पानांचे कवळे फुटवे तांबूस रंगांचे असतात. पान गळून गेल्यानंतर न लक्षात येणारी फुले पानांच्या जागी येतात. हिवाळ्यात फळधारणा होऊन, १ ते ३ सेंटीमीटर गोल आकाराचे फळ उन्हाळ्याच्या सुरुवातीला पिकतात. सुरुवातीला हिरवी असलेली फळे पिकल्यावर पिवळी किंवा लाल होतात. फळ पक्षांना व माकड, खार सारख्या प्राण्यांना आवडतात. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू याचे लोथ हा वृक्ष वस्तीस्थान आहे.