वडाचा एक प्रकार, यांची पाण लहान असतात. विस्तार वडा पेक्षा कमी. पण पर्णसंभार वडा पेक्षा दाट असतो. पारंब्या लांब पण खुपच बारीक , दोऱ्या सारख्या, अनेक संख्येने एकत्रित लोंबलेल्या असतात. झाडांच्या विविध फांद्यांवर असे लोंबलेले बारीक पारंब्यांचे झुपके झाडांचे सौंदर्य खुलवण्यास खूपच मदत करतात. पूर्वी भरपूर प्रमाणात रस्त्यांच्या कडेने दिसणारी झाडे. रस्ता रुंदीकरण्याच्या कामात तोडीत मुळे संख्येने खूपच कमी झालीत.नर्सरी मध्ये पण याची रोपे सहजासहजी मिळत नाहीत.