मध्यम जास्त पावसाच्या प्रदेशात वाढणारा वृक्ष. नैसर्गिक रित्या डोंगर उतारावर दिसतो. मुरमाड, खडकाळ जमिनीत वाढणारा. साधारण पन्नास ते साठ फूट, सरळ उंच आटोपशीर पर्णसंभार असलेला, पानगळीचा वृक्ष.खोड सरळ उंच असते. साल राखाडी रंगांची काहीशी मऊ असते. खोडाला फांद्या दहा पंधरा फुटांवरून आडव्या पसरलेल्या असतात. पान लांबट आकाराची देठा कडे निमुळती मध्यभागी पसरट टोकाकडे टोक असलेले . पान तळहाता येवढी मोठी असतात. पानांच्या कडा दातेरी , पान टोका कडे काहीशे नागाच्या फण्यासारखे वळलेले असतात. काही ठिकाणी पानांनच्या दोन्ही बाजुच्या कडा पानांनच्या मधल्या शिरेच्या दिशेने वेडी वाकडी खाच पडलेले असतात, त्यामुळे पांनांचा वेगळाच आकार बघायला मिळतो. पान खुपच खरखरीत असतात.पानांचा वापर पाॅलीश पेपर सारखा केला जातो.फळ मार्च मध्ये येण्यास सुरुवात होते. फळांना अर्धा ते पाऊण इंच भर लांब देठ असते. साधारण दिड सेंटीमीटर गोल लवयुक्त फळ. पानगळ उन्हाळ्यात होत. पानगळ झालेल्या झाडावर, फळ उठून दिसतात.फळ पिवळे होतात. परिपक्व झाल्यावर लाल रंगाचे होतात. पक्षांना फळ आवडतात. औषधी गुणधर्म असलेला पर्यावरणीय परिसंस्था अबाधित राखण्यासाठी उपयुक्त वृक्ष.अश्या लुप्त होत चाललेल्या वृक्षांच्या प्राजातिंची रोप तयार करण्यासाठी सामाजिक वनीकरण व वनविभाग ने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. माझ्या वृक्ष परिचय केंद्रामध्ये एक व नासिक देवराई येथे तीन रोप लावली आहेत. छान वाढली आहेत.