राष्ट्रीय वृक्ष म्हणून मान्यता मिळालेला हा अवाढव्य वृक्ष.सर्वांना याच्या आकार, पर्णसंभारचा विस्तार,पारंब्यांवरण लांबुन बघितल्यास ओळखता येते.पण बरेच लोकांना लहान किंवा आठ दहा फुटाचा वृक्ष जवळुन बघितल्यास हा वड आहे हे ओळखता येत नाही हे पण एक वास्तव आहे. वड म्हटलं की त्याचे गुणधर्म सर्वपरिचित असल्याकारणाने त्याच्याविषयी जास्त काही सांगण्याची गरज नाही.
पण वडाचे विविध प्रकार आहेत, हे मात्र आपण आज थोडक्यात समजुन घेऊ या.