पिंपळाचा प्रकार, खडक पायर एक वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष. ह्याचे नावच बरेच काही सांगून जाते. जेथे माती चा लवलेशही नाही, अश्या ठिकाणी हा वृक्ष कड्या कपारीत नैसर्गिक रित्या वाढलेला असतो. बऱ्याच ठिकाणी किल्ल्यांच्या भिंतींवर उगवलेला दिसतो.पान पिंपळा सारखीच पण बरीच मोठी असतात. डिसेंबर जानेवारीत याची पानगळ होते.उन्हाळ्यात याला फळ असतात. फळ पक्षांना आवडतात. पक्षांच्या विष्टेतून याचा प्रसार होतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला याला पान येण्यास सुरुवात होते.पान मोठी हाताच्या पंजा येवढी असतात. काही ठिकाणी याची मुळ उंच कड्या कपारीतून खडकाला चिकटून शंभर फुटापर्यंत खाली जमिनीच्या दिशेने खाली आलेली दिसतात.मुळ जाळीच काम करतात, बराच ठिकाणी दगडांना जखडून ठेवतात. त्यामुळे दगड ढासळत नाहीत. बहुगुणी हा वृक्ष आपल्या अवतीभोवतीच्या छोट्या मोठ्या डोंगरांवर खडकाळ मुरमाड जमिनीमध्ये पर्यावरण संतुलनासाठी लावण्यास योग्य.