बुच पांगारा

erythrina suberosa

कमी,मध्यम पावसाच्या ठिकाणी येणारा वृक्ष.उष्ण, कोरड्या हवामानात , मुरमाड, खडकाळ हलक्या प्रतीच्या जमिनीत वाढणारा वृक्ष. मध्यम उंचीचा, आटोपशीर पर्णसंभार असलेला, पानगळ होणारा वृक्ष. खोड काहीसे वेडेवाकडे वाढलेले असते. खोडावर खोलगट उभट खाचा असतात.खोडावरची साल बुचा सारखी मऊ, जाड असते. काही कवळ्या फाद्यांना काटे असतात. नंतर काटे गळून पडतात.खोड फिकट तपकिरी रंगाचे.पान पळसासारखेच त्रिदलीय पर्णिका असलेले.पानांना खालुन लव असते. पानगळ डिसेंबर जानेवारी होते.निष्पर्ण झाडावर फेब्रुवारी मार्च मध्ये भडक केशरी रंगाच्या फुलांचे गुच्छ दिसतात. फुल साधारण दिड दोन इंच लांब व एक दिड सेंटीमीटर रुंद असते.फुलांनवर मध खाण्यासाठी विविध पक्षी दिसतात. एप्रिल मध्ये हिरव्या लोंबलेल्या शेंगा दिसू लागतात. शेंगा तिन ते चार इंच लांब, फुगीर असतात,बारीक तारे सारखा टोकाकडे शेंडा निघालेला असतो.परिपक्व शेंगा काळपट तपकिरी रंगाच्या असतात. शेंगा एका बाजूने उकलतात व गळून पडतात. गळून पडलेल्या शेंगांना काळपट गोलसर बिया चिकटकलेल्या असतात. शेंगा आतमधुन चंदेरी व लवयुक्त असतात.उन्हाळ्यात पक्षांना उपयुक्त ठरणारा वृक्ष.

identity footer