जंगली अजाण

ehretia laevis

खडतर परिस्थितीत वाढणारा साधारण दहा ते पंधरा फुट उंची असलेला बुंध्यावर ओबडधोबड उंचवटे असलेला,पानगळ होणारा हा, बहुगुणी वृक्ष आहे. मंद सुवास असलेले पांढरे शुभ्र चांदणीच्या आकाराची फुलं तुर्यामध्ये संख्येने येतात.उन्हाळ्याच्या सुरुवातीला वाटाणा एवढे गोल हिरव्या रंगाच्या चकचकीत फळांचे घड दिसु लागतात,फळ पिकल्यावर नारंगी रंगाचे सुंदर घड दिसतात. पिकलेल्या फळांवर ताव मारण्यासाठी विविध पक्षांची ह्या छोटेखानी झाडावर ये जा सुरु असते. मुरमाड,खडकाळ, पोषक घटक कमी असलेल्या जमिनी वर पण हा सहजगत्या वाढतो.मी रहातो त्या परिसरात मनपाच्या उद्यानाच्या जागेत, आपण केलेल्या वृक्ष परिचय केंद्रामध्ये,आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी जवळ आढळणारा अजान वृक्ष हा त्याचाच एक प्रकार, त्याची लागवड केलेली आहे.ज्याचे रोप फांद्यांपासून पण तयार होतात. त्याची उंची साधारण चाळीस फुटापर्यंत होते. जंगली अजान व ह्या आळंदीच्या अजान वृक्षा च्या पानांमध्ये काहीसा फरक आहे.जंगली अजान ची रोप बी पासूनच तयार होतात. औषधी गुणधर्म असलेल्या ह्या वृक्षांची वृक्षारोपण करताना, नक्कीच निवड करावी.

identity footer