पुत्रणंजीवा

drypetes roxburghii

मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात वाढणारा वृक्ष. पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत, उष्ण, कोरड्या हवामानात वाढतो. भरगच्च पर्णसंभार असलेला, मध्यम आकाराचा, सदाहरित वृक्ष. पस्तीस ते चाळीस फुटांपर्यंत वाढतो. खोडावरची साल खडबडीत व फिकट तपकिरी रंगाची असते,खोड सरळ वाढते. आठ दहा फुटांवर फांद्या फुटतात.फांद्यावर भरपूर पानांनी लगडलेल्या उप फांद्यां असतात, त्यामुळे वृक्ष भरगच्च दिसतो. उप फांद्या खालच्या बाजूस झुकलेल्या असतात. पान लहान देठाची, एका आड एक असतात. पान साधारण दोन इंच लांब, एक इंचभर रुंद व टोकदार असतात. पानांनच्या कडा झालरी सारख्या असतात.पान गडद हिरवी, चकचकीत, असतात. हिवाळ्याच्या शेवटी पानांनच्या बगलेत पिवळसर रंगाची सुक्ष्म फुल संख्येने येतात. फुल झाडावर आली आहेत हे लवकर लक्षात येत नाही. फुल एप्रिल मे पर्यंत असतात. फळ धारणा मार्च एप्रिल मध्ये होते. फळ साधारण एक सेंटिमीटर गोलसर व टोकदार असतात. फळांन मध्ये औषधी गुणधर्म आसल्या कारणाने काही आजारांनसाठी वापर केला जातो. आटोपशीर, डेरेदार, दाट सावलीचा वृक्ष. पुत्रणंजीवा हा सदाहरित वृक्ष,योग्य ठिकाणी लागवड केल्यास परिसराचे सौंदर्य वाढवण्यास मदत होईल. ह्याची रोप नर्सरीं मध्ये सहज उपलब्ध होतात. माहिती नसल्या कारणाने ह्याची लागवड सामान्यता केली जात नाही.

identity footer