पावसाळ्याच्या शेवटी फळ येण्यास सुरुवात होते. फळं दीड ते दोन सेंटीमीटर व्यासाची काहीशी लांबट गोल आकाराची असतात. फळांवर पांढऱ्या उभ्या कमी अधिक लांबीच्या व रुंदीच्या पांढऱ्या रेषा असतात. फळ गुळगुळीत हिरव्या रंगाची व त्यावरील पांढऱ्या रेषांमुळे उठून दिसतात. परिपक्व फळं चॉकलेटी रंगाची असतात. पण पांढऱ्या रेषा जशाच्या तशा असतात, त्यांच्या रंगात बदल होत नाही. हिरवे, चॉकलेटी रंगाची पांढऱ्या रेषा असलेली विलींवर लटकलेली फळ लक्षवेधून घेतात. फळांमध्ये असलेल्या बिया शिवलिंगाच्या आकाराच्या असतात. म्हणून या वेलीला शिवलिंगी असे संबोधले जाते. शिवलिंगीच्या फळांवर कोकिळात ताव मारतात. शिवलिंगी, कमी, मध्यम पावसाच्या प्रदेशात येणारा हा वेल आहे. पाण्याचा निचरा होणारा जमिनीत तो वाढतो शिवलिंगी हा पावसाळ्यात उगवणारा हंगामी वेल आहे. हिवाळ्याच्या शेवटी हा वाळलेला असतो पक्षांच्या विष्टेतून प्रसार झाल्यामुळे हा बऱ्याच ठिकाणी पावसाळ्यात वाढलेला दिसतो. कमी कालावधी तो भरभर वाढुन पसरतो. पान एकाआड एक येतात. ती हस्तांकृती असतात, त्यांच्या कडा दातेरी असतात. पानवरून खरखरीत असतात. फुलं पावसाळ्यात येतात फुलं पिवळ्या रंगाची पानांच्या बगलत येतात. पावसाळ्यात नैसर्गिक रित्या येणारा हा औषधी गुणधर्म असलेलि वेल आहे.