तेंदु

diospyros melanoxylon

मध्यम ,कमी पावसाच्या प्रदेशात कोरड्या, उष्ण हवामानात, मुरमाड, खडकाळ, जमीन वाढणारा, मध्यम उंचीचा, ऑटोपशीर पर्णसंभार असलेला हळू वाढणारा,पानगळी वृक्ष. उपलब्ध जमिनीुसार वाढ होते. तेंदुचे खोड सरळ वाढते. गर्द तपकिरी अथवा काळा रंगाची खडबडीत साल असते. खोडावर उभट आयाकृती खवले पडलेले असतात. साल ही तपकिरी व काळ्या रंगाच्या थराने बनलेली असते. पान लंबा कृती असतात. पान साधारण पाच ते नऊ इंच लांब तीन चार इंच रुंद असतात. नवीन पालवीचे फुटवे लव युक्त असतात.नवीन पालवी तांबूस रंगाची असते. पानावरून हिरवी गुळगुळीत व खालच्या बाजूने फिक्कट हिरवे असतात. पानगळ हिवाळ्यात होते. नवीन पालवी एप्रिलमध्ये येण्यास सुरुवात होते. पांढरी छोट्या फुलांचे तुरे पानांच्या बगलेत मे जून मध्ये येतात. फळ पावसाळ्याच्या शेवटी येण्यास सुरुवात होते. पूर्ण वाढ झालेली फळ गोल लिंबाएवढा असतात. फळ देठ रहित फांद्यांना बूड चिकटलेली असतात. फळ उन्हाळ्यात पिकतात. पिकलेली फळे पिवळी होतात. खाण्यास गोडसर असतात. फळ पक्षांना आवडतात. फळ म्हणजे पौष्टिक रानमेवा. औषधी गुणधर्म असलेला उपयुक्त वृक्ष. याची पानं बिडी बनवण्यासाठी वापरले जातात. दुर्मिळ होत चाललेल्या उपयुक्त अशा तेंदू वृक्षाची रोपे मोठ्या प्रमाणात सरकारी रोपटी रोपवाटिकांमध्ये तयार करून लागवडीसाठी प्रबोधनाची गरज आहे. जनसामान्यांनी पण वृक्ष लागवड करताना अशा पर्यावरण पूरक वृक्षांची रोप मिळवून लागवड केल्यास, आपली पर्यावरणीय परी संस्था अबाधित राहण्यास मदतच होईल.

identity footer