करमळ / चलता

dillenia indica

मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात, चांगला जलसस्तर असलेल्या जमिनीत वाढणारा पानगळ‌ होणारा मध्यम आकाराचा वृक्ष. तिस ते पस्तीस‌ फूट उंच वाढणारा, दाट पर्णसंभार असलेला वृक्ष. खोड तपकिरी रंगाचे,सरळ वाढणारे, भेगाळलेली साल असते. वृक्षाचा पर्णसंभार खूपच छान असतो. करमळचे पान साध्या पद्धतीचे, एक आड एक, फांद्याच्या टोकाकडे गर्दी केलेली असतात. पानाची रचना सुंदर असते. लांब देठ असलेले, पानं, गर्द हिरवी, दहाबारा इंच लांब व चार पाच इंच रुंद असतात. पानांच्या कडा टोकदार, कतरलेल्या, करवती सारख्या असतात. पानांवर अनेक, स्पष्ट, उठावदार शीरा असतात. पानगळ उन्हाळ्याच्या शेवटी होऊन पावसाळ्याच्या सुरुवातीला नवीन पालवी फुटते. पावसाळ्याच्या सुरुवातीला, सुंदर रचनेची, मोठी पांढरी फुलं साधारण १५ सेंटीमीटर व्यासाची, फांद्यांच्या टोकावर येतात. फुलांना गोडसर सुगंध असतो. फुलांवर मधमाश्या गर्दी करतात. साधारण साडेतीन इंच व्यासाची मोठी, लांब देठ असलेली फळ असतात. फळ बाहेरून टणक, आतुन मासल गरयुक्त असतात. फळ सुरवातीला हिरव्या रंगाची, पिकल्यावर पिवळसर रंगाची होतात. फळा मध्ये मूत्रपिंडाच्या आकाराच्या अनेक चपट्या, केसाळ कडा असलेल्या काळसर रंगाच्या बिया असतात. औषधी गुणधर्म असलेला, शोभिवंत वृक्ष.

identity footer