तिवस

desmodium oojeinense

खोडाच्या रंगामुळे तिवस वृक्षाला काळा पळस असेही म्हटले जाते. त्याचे लाकूड कठीण चिवट असते. लाकडाला वाळवी लागत नाही. आयुर्वेदामध्ये त्याच्या डिंकाचा उपयोग औषधांमध्ये केला जातो. पूर्वी आपल्याकडे विपुल प्रमाणात काही शेतांच्या बांधावर असलेला वृक्ष. आता डोंगर उत्तरावर मर्यादित राहिला आहे. चला तर मग यावेळी वृक्षारोपण करतांना, या अनेक गुणधर्म असलेल्या वृक्षाचे रोप लागवड करून, निसर्गातील जैव विविधता टिकवण्याचा प्रयत्न करूयात. तिवस वृक्षाचे शास्त्रीय नाव आहे आउजीनिया आउजेनेन्सिस. काळपट तपकिरी रंगाचे चौकोनी खवले असलेले खोड. पळसा सारखीच त्रिदलीय पानांची रचना. मधली पर्णिका बाजूच्या दोन पर्णिकांपेक्षा आकाराने मोठी असते. पर्णिकांच्या कडा नागमोडी, थोडे टोक असल्यासारखे असतात. हिवाळ्यात पानगळ होते. मार्च एप्रिलमध्ये पांढरे गुलाबी अनेक छोटे मंद सुगंध असलेली असलेली फुलांनी झाड भरलेले असते. मे जून मध्ये नवीन पानांनी झाड बहरू लागते. नवीन पालवी पूर्ण झाडावर जेव्हा बहरते, त्यावेळेस एक वेगळीच रंगछटा झाडाच्या पर्णसंभाराला असते. पानांच्या कडाचा भाग काहीसा तांबूस रंग व देठाकडे थोडा फिकट होत जात हिरवट होतो. हा नजारा छान असतो. तीन-चार बिया असलेल्या चपट्या, प्रत्येक बिनंतर चिमटा बसल्या सारख्या असलेल्या, शेंगा येतात.

identity footer