वरुण/वायवर्णा

crataeva nurvala

पंचवीस ते चाळीस फूट उंच वाढणारा मध्यम आकाराचा पानगळ होणारा वृक्ष. जमिनीच्या स्तरानुसार त्याच्या उंचीवर फरक पडत असतो. हिवाळ्यात ह्या वृक्षांची पानगळ होते. झाड बराच काळ निष्पर्ण राहते.नेहमी झाड हे पालविने भरलेलं असतं अशी संकल्पना मनामध्ये रुजलेल्या लोकांना अशा वेळेस हे झाड वाळल की काय असा त्यांचा समज होतो. उन्हाळ्याच्या मध्यामध्ये यांना नवीन पालवी व फुल एकाच वेळी येण्यास सुरुवात होते. फुलं खूपच आकर्षक व मंद सुगंध असलेले असतात. फुलांची रचना म्हणजे पांढरीशुभ्र चार सुट्या पाकळ्या, पंधरा ते वीस लांबट, जांभळट रंगाचे पुंकेसर,छोट्या पिवळ्या लांबट टोप्या घातल्यासारखे, बाहेर डोकवत आपलं अस्तित्व आपल्या सौंदर्याने दाखवत असतात.ह्या वृक्षाच्या पानांची रचना जवळपास बेलाच्या पानांन सारखी भासते. दीड ते दोन इंच बोरासारखी दिसणारे फळ येतात. पिकल्यावर ती लाल होतात. आयुर्वेदामध्ये विविध रोगांवर या पासून औषध बनवतात, याचा मुख्य औषधी उपयोग मुतखड्याचा नाश करण्यासाठी केला जातो. असा हा पर्यावरण पूरक, औषधी गुणधर्म असलेला सर्वगुणसंपन्न वृक्ष, वृक्षारोपण करताना दुर्लक्षितच राहून गेला आहे.

identity footer