गणेर / सोन सावर

cochlospermum gossypium

कमी पावसाच्या डोंगराळ, खडकाळ, मुरमाड भागात हे वृक्ष आढळतात. तिस ते चाळीस फूट उंच वाढणारा,आटोपशीर पर्णसंभार असलेला हा वृक्ष आहे.खोड व फांद्या या बऱ्यापैकी मऊ असतात. जानेवारीच्या दरम्यान,निष्पर्ण झालेल्या या वृक्षांच्या फांद्यांच्या टोकाला कळ्या येण्यास सुरुवात होते. जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत येणारी,पिवळी धमक ,केशरी रंगाचे पुंकेसर असलेले,आकाराने मोठी फुलं आपलं लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही.त्याची रंगछटा बघतच राहावी.निसर्गाची फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी एक विलक्षण संधी च म्हटली पाहिजे.मार्च मध्ये फळ येण्यास सुरुवात होते. सुरुवातीच्या काळात हिरव्या फळांना छान लव असते.अडीच ते तीन इंच, काहीशी सेमला मिरचीच्या आकाराची फळे येण्यास सुरुवात होते.परिपक्व झाल्यास ती गर्द तपकिरी रंगाची काहीशी चमकदार असतात. काही फळ गळून पडतात. काही झाडावरच उकळतात, गोल छोट्या बियांना कापसाचे आवरण असतं. वाऱ्याच्या झोताने यांचा प्रसार होऊन विविध ठिकाणी या रुजतात व नैसर्गिक रित्या झाडांच्या संख्येत वाढवण्यास मदत होते.आयुर्वेदामध्ये ह्या पर्यावरण पूरक वृक्षाचा चांगला उपयोग होतो.

identity footer