भेरलीमाड

caryota urens

मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात वाढणारा. मुरमाड, दगडगोट्यांच्या जमिनीत वाढतो. उंच सरळ वढणारा सूदंर वृक्ष. साधारण साठ फूट उंच वाढु शकतो.खोड सरळ उंच गोल खांबासारखे वाढते. खोड वरती वाढत जाते तसे त्यांच्यावर गळुन गेलेल्या पानांच्या खुणा असतात व खालचा भाग हिरवट गुळगुळीत व नंतर राखाडी रंगाचा होतो. प्रत्येक पान गळून गेल्यानंतर त्याठिकाणी खोडाच्या परिघाला रिंगण पडलेले दिसते. पान संयुक्त, पानांची मुख्य शिर जाड लांब व टोकाकडे जमिनीच्या दिशेने झुकलेले असते. पानं साधारण बारा ते पंधरा फुटापर्यंत लांब व सहा ते आठ फुट रुंद असतात.पान, पर्णिका व उपपर्णिका अश्या प्रकारच्या रचनेची असतात. उप पर्णिका चार ते सहा फुटाच्या असतात. उप पर्णिका त्रिकोणी माश्याच्या शेपटीच्या आकाराच्या देठाकडे निमुळती व टोकाकडे पसरट व टोकाकडची आडवी कडा कतरलेली सुंदर रचनेची असतात. ह्या उपपर्णिकेच्या रचनेमुळे " फिशटेल पाम " नाव पडले आहे. शोभिवंत असल्याने ह्या उपपर्णिकांचा वापर बुके सजवण्या साठी केला जातो. फुलांच्या माळा आठ ते दहा फुट लांब एकत्रितपणे संख्येने एकाच जाडसर दांड्यांतुन निघालेल्या व लोंबलेल्या असतात. कळी ते फळ गळून पडलेल्या माळांचे असे वेगवेगळ्या परिस्थिती तिल झुपके उंच वाढलेल्या खोडाला वेगवेगळ्या उंचीवर लटकलेले खुपच अनोख दृश्य असते. हे सौंदर्य न्याहाळत रहावे असे वाटते. अश्या अवस्थेत वृक्ष खुपच दिमाखदार दिसतो. फळ गोलाकार दोन एक सेंटिमीटर व्यासाची, सुरवातीला हिरवट पिकल्यावर काळपट होतात. पक्षांना, मधमाश्यान साठी आवडीचा वृक्ष. बहुउपयोगी सुंदर असा हा वृक्ष, योग्य ठिकाणी शोभिवंत वृक्ष म्हणून लागवड केल्यास परिसराची शोभा वाढेल व काही पर्यावरणीय घटकांना उपयोगी पडेल.

identity footer