कंधार

capparis sepiaria

कंदार हे मोठ झुडूप किंवा आधार मिळाल्यास ते वेलवर्गीय सारखं वाढते. कमी मध्यम पावसाच्या ठिकाणी येणार. उष्ण कोरडे हवामानामध्ये , मुरमाड, व पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढणारे सदाहरित काटेरी झुडूप. बऱ्याच लोकांना ते लक्षात येत नाही ,बघितल्यास करवंद तचे झुडुप वाटते. कंधार चे खोड गर्द हिरवे व जमीनी पासून दीड दोन फुटांपर्यंत छोट्या छोट्या बारीक वाळलेल्या सालीच्या पांढरट रेषा असतात.शाखा व उपशाखा गुळगुळीत हिरव्या रंगाच्या असतात.पान एक दिड इंच लांब व एखादा इंच रुंद, टोकाला काहीशी निमुळती असतात. पानांनचा रंग वरतुन हिरवा व मागच्या बाजूला फिकट हिरवा असतो.पान वरतुन गुळगुळीत खालच्या बाजूने काहीशी खरबरीत असतात. काटे छोटे अर्धा सेंटीमीटर, हुका सारखे खूपच टोकदार असतात.पानांच्या बुडाशी पानांनच्या मागच्या बाजूला वळलेले काटे जसे काही, पानाचे रक्षण करण्यासाठीच असल्यासारखे. फुलण्याचा काळ मार्च ते मे पर्यंत असतो. फुल पांढरीशुभ्र तिन चार पसरट पाकळ्यांन मधुन दोन अडीच सेंटीमीटर चे पंचवीस तीस केसाळ पुंकेसर निघालेले असतात. वाटाणा सारखी लांब देठ असलेली हिरवी चकचकीत लोंबलेली फळ जून जुलै मध्ये येतात. फळ पिकल्यावर काळी पडतात. फळ पक्षांना खूप आवडतात. रोपांसाठी झाडांवर फळ मिळवणे म्हणजे जरा अवघडच. पक्षांच्या विष्टेतून यांचा चांगला प्रसार होतो. अशा ह्या निसर्गाच्या दृष्टीने महत्त्वाचा पर्यावरण पूरक झुडपांची रोप कुठल्याही नर्सरीत मिळत नाहीत. दोन-तीन वर्षापासून मी बी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. नशिबाने ह्यावर्षी मला देवराई मध्ये यांची काही फळ मिळाली आहेत. डोंगर उताराला वृक्षारोपण करताना याची निसर्गप्रेमींना रोप सहज उपलब्ध व्हावीत यासाठी प्रयत्न सुरू आहे.

identity footer