पाचुंदा

capparis grandis

कमी व मध्यम पावसाच्या ठिकाणी, डोंगराळ भागात व कोणत्याही प्रकारच्या जमिनीत कोरडा हवामानात येणारा, दुरून बघितल्यास बोराचा वृक्ष असल्यासारखा भास होतो. बोरांच्या वृक्षाच्या पानाशी साधर्म्य असलेला वृक्ष. पण याची पान मुलायम,लव असलेली असतात.भरगच्च पर्ण संभार असलेला काही ठिकाणी पंधरा फूट तर कुठे पंचवीस एक फुटापर्यंत वाढलेला,छोटे हुका सारखे काही से काटे असलेला वृक्ष. बुचा सारखी याची म‌ऊ ,उभ्या रेषेत वेडी वाकडी भेगाळलेली व खडबडीत जाड साल असते. मंद सुगंध असलेली पांढरी,वीस ते पंचवीस लांबट पुंकेसर असलेली फुलं एप्रिल ते जून दरम्यान झाडावर दिसतात. गोल चकचकीत बोराएवढी पिकल्यावर तांबूस जांभळा रंगाची फळ, ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत असतात. काही पक्षांना हि फळ आवडतात. पूर्वी आपल्या नाशिक शहर व परिसरामध्ये हि झाड विपुल प्रमाणात होती आता शहरांमध्ये मोजून सात ते आठ झाडे शिल्लक राहिली आहेत. सुरुवातीला या झाडांची रोपे तीन एक वर्ष हळू वाढतात. त्यानंतर त्यांचा वाढीचा वेग चांगला असतो. याची रोपं पिशवीत मोठी होत नाही. वृक्ष लागवड करताना फोटोत दिसत नाही. म्हणून ह्या अति महत्त्वाच्या जैव विविधता टिकवणार्या वृक्षाची लागवड करतांना लोक याला टाळतात. त्यामुळे हा वृक्ष धोक्याच्या पातळीवर आला आहे.

identity footer