चारोळी

buchanania cochinchinensis

चारोळीच्या फळांच्या आत एकच बी असते. बी म्हणजे आपण खातो ती, ही चारोळी. कोरड्या, उष्ण, कमी पावसाच्या प्रदेशात वनांमध्ये आढळणारा हा मध्यम आकाराचा उंच खोड असलेला, चारोळी हा पानगळ होणार वृक्ष आहे. त्याचे शास्त्रीय नाव आहे, बुखनानिया लॅन्झन. मुरमाड हलक्या प्रतीच्या जमिनीत चांगला वाढतो. अशा या प्रदेशात काही ठिकाणी शेताच्या बांधावर आढळतो. काळपट तपकिरी रंगाची साल असते. सालीला उभ्या आडव्या खाचा पडलेल्या असतात. पान मोठी लांबट गोलसर आणि साधारणतः आठ ते दहा इंच लांब व सात ते आठ इंच रुंद असतात. पान जाडसर वरचा भाग थोडा खरखरीत असतो. पानाच्या खालच्या भागाला लव असते. उन्हाळ्याच्या सुरुवातीला पानगळ होते. चांदणी सारखी दिसणारी छोटी बिगर देटाची,हिरवट पांढरी फुलं असतात. फुलांचे छोटे गुच्छ फांद्यांना चिकटून येतात. फुले जानेवारी ते मार्च मध्ये येतात. वाटाणे एवढे कठीण कवचाचे फळे एप्रिल- मे मध्ये येतात. फळ पक्षांना आवडतात. फळ गोड असतात. अशा या उपयोगी वृक्षांची लागवड योग्य ठिकाणी करावी. काही ठिकाणी फळबागेत त्याची काही प्रमाणात लागवड करून चांगली उत्पादन घेता येईल.

identity footer