महाराष्ट्रात सर्वच वनांमध्ये कमी अधिक प्रमाणात आढळणारा, तीस ते पन्नास फूट वाढणारा, पानगळीचा वृक्ष. शहरात रस्त्याच्या कडेने व उद्यानाच्या जागेत लावण्यास योग्य. शहर व गावालगत उघड्या बोडक्या डोंगरांवर वृक्षारोपण करत असाल तर याची निवड नक्कीच करावी. हिरवट पिवळ्या रंगाची मध्ये भागी काहीशी तांबुस छटा असलेले लहान फुलं पानांच्या बेचक्यात येतात. फुल येण्याचा काळ हा पावसाळ्यात ते नोव्हेंबर च्या दरम्यान असतो. वाटाणा एवढी पिकल्यावर गडद तपकिरी काळपट रंगाची, गोडसर रसाची असतात. जानेवारी ते एप्रिल या दरम्यान येतात. पक्षांना याची फळ आवडतात. सुरुवातीच्या काळात त्याच्या खोडावर दोन ते तीन इंचाचे आडवे मजबूत काटे असतात. कालांतराने ते गळून पडतात. नवीन पालवी येते, त्यावेळेस कवळ्या पानांची रंगछटा खूप छान असते. यामध्ये मी पानांच्या रचनेवरून दोन प्रकारच्या आसाना बघितला, एक मोठ्या पानांचा आसाना साधारण सात ते आठ इंच लांब पान आणि लहान तिन ते चार इंच लांब पानांचा आसाना. आयुर्वेदिक दृष्ट्या महत्त्वाचा व निसर्गाची साखळी आबादीत राखण्यासाठी उपयुक्त असा हा वृक्ष. वृक्षारोपण करताना आवर्जून लावावा.