सल‌ई

boswellia serrata

सदैव वृक्ष डोंगर उत्तराला वृक्ष लागवडीसाठी योग्य आणि संवर्धनासाठी कमी श्रम लागणारा उपयुक्त वृक्ष आहे. कोरड्या हवामानात, खडकाळ, मुरमाड, जमिनीवर प्रामुख्याने नैसर्गिकरित्या आढळणारा मध्यम आकाराचा वृक्ष. खोड फारसे उंच अथवा सरळ नसते. सालीचा रंग हिरवट पिवळा असतो. खोडाची पापुद्रासारखी साल व ढपले निघतात. फांद्यांच्या शेवटी पान असतात पर्निकांच्या कडा करवती सारख्या कातरलेल्या असतात. पानांमध्ये सुवासिक गंध असतो. लहान आकाराची पांढरी फुलं मंजिरी युक्त जानेवारीमध्ये फुलण्यास सुरुवात होते. एप्रिल पर्यंत फुलण्याचा काळ सुरू असतो. जसे फुल गळतात त्या ठिकाणी फळधारणा फेब्रुवारीपासून सुरू होते व मेपर्यंत फळ धरणेचा काळ असतो. वेलदोड्याच्या आकाराची,तीन धारांनी युक्त छोटी साधारण दोन सेंटीमीटर त्रिकोणी आकाराची लांबट फळे वाढल्यावर तीन भागात उकलतात. मऊ पापुद्रा असलेले काहीसे त्रिकोणी आकाराचे बारीक बियाणे चारी बाजूने पातळ झालर असलेले असतात. ह्या वृक्षाचे लाकूड ठिसूळ असते. त्याचा पासुन मिळणारा सुगंधी डिंक उपयुक्त आहे. ज्वलनशिल डिंकाचा उपयोग धुपासारखा करतात. औषधी गुणधर्म असलेल्या या वृक्षाच्या विविध अंगाचा उपयोग आयुर्वेदामध्ये केला जातो. या वृक्षाच्या बियांचे सिडबॉल करून योग्य ठिकाणी टाकल्यास नक्कीच फायदेशीर ठरेल.

identity footer